मेहकर : डॉ. अनिलकुमार गायकवाड हे नवनवीन तंत्रज्ञानाशी सतत नाते जोडत असतात. त्यातून परिसरातील गरजू लोकांची गैरसोय कशी टाळता येईल याकडे त्यांचा कल असतो.
रक्ताच्या सर्व तपासण्याची अद्यावत मशिनरी व त्यातील तज्ज्ञ मेहकरात आणल्यानंतर मेट्रो सिटीत असणारी अद्ययावत व आधुनिक मशीन जिल्ह्यात मेहकरसारख्या छोट्या शहरात ३२ स्लाइस सिटीस्कॅन मशीन शहरात आणून या भागातील लोकांची फार मोठी सोय त्यांनी केली. पूर्वी मेट्रो सिटीत रुग्णांना धाव घ्यावी लागायची. आता त्याची गरज पडणार नसल्याचे सांगून ३ डी, ४ डी सोनोग्राफी मशीन, डिजिटल एक्स-रेसारखी सुविधा उपलब्ध केल्याबद्दल खासदार प्रतापराव जाधव यांनी डॉ. अनिलकुमार गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. ते अभियश रेडिओ डायग्नोस्टिक सेंटरच्या शुभारंभनिमित्त आयोजित कार्यक्रमात रविवारी बोलत होते.
यावेळी आमदार संजय रायमूलकर, तहसीलदार डॉ. संजय गरकल, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, युवा सेनेचे जिल्हाधिकारी ऋषी जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. ठोंबरे, पत्रकार सिद्धेश्वर पवार उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत डॉ. अनिलकुमार गायकवाड, डॉ. श्रीमती गर्विता सिंग, रवि अग्रवाल, डॉ. शिवानी गायकवाड, यश अग्रवाल यांनी केले.(वा.प्र.)