लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर० कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत आठवडी बाजार भरविल्या प्रकरणी अमडापूर येथे शुक्रवारी २५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधितांना २५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली.
अमडापूर येथे बाजार भरल्याने लाॅकडाऊनचा फज्जा
अमडापूर
अमडापूर व परिसरात वाढता कोरोणा विषाणू वाढत असल्याने , नागरिकांना शासनाच्या आदेशानुसार तोंडावर मास्क , फिजिकल डिंस्टंनसिंग सर्व जनिक ठिकाणी गर्दी करुं नये व शासनाच्या सुचनेचे पालन करावे , तरी सुद्धा नागरिक कोणत्याही आदेशाचे पालन न करता बिनधास्त फिरताना दिसत असल्याचे चित्र दिसत आहे. या साठी शासन प्रशासन नेहमी कोरोणा विषयी जनजागृती करून सुद्धा नागरिक गांभीर्यानं घेत नाही. या वर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन हे नागरिकांना दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने चालवणाऱ्याना दंडाचा बडगा उगारला आहे.
दि. ३१ मार्च रोजी बाजार भरवू नये असे शासनाचे आदेश असताना सुद्धा वाॅर्ड न. ५ मधील मुख्य रस्त्यावर बाजार भरल्याने मोठी गर्दी झाली होती . यामुळे कोरोणा विषाणू आजाराला आमंत्रण दिल्यासारखे झाले होते यावर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करून २५ नागरिकांकडून २५०० दंड वसूल केला आहे. तसेच काही बिना मास्क न लावणाऱ्या ना सुद्धा दंड वसूल केला आहे. या साठी प्रत्येक नागरिकानी शासनाने दिलेल्या आदेश व नियमांचे पालन करावे व भरलेल्या बाजारा मध्ये सोशल डिंस्टसिनगचा फज्जा उडाला आहे.