- जयदेव वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: पिक परिस्थिती ,पाऊस पाणी, त्याचबरोबर सामाजिक आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली भेंडवडची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दिनांक ७ मे रोजी जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम भेंडवड येथे करण्यात येणार आहे.महाराष्ट्रभर जिकडेतिकडे पाण्याचे दुर्भिक्ष त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे त्यामुळे या वर्षी पावसाचे अंदाज काय राहील याकडे संपूर्ण शेतकरी वगार्चे लक्ष लागले आहे.बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीकाठी वसलेल्या या गावी घटमांडणीची परंपरा साडेतीनशे वर्षांपासून सुरू आहे यातील बरीच भाकिते खरी ठरल्याचे लोक सांगतात. त्यामुळे शेतकर्यांचा या मांडणीवर विश्वास आहे. दरवर्षी भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी जमतात आणि यावरून पुढील खरीप आणि रब्बी हंगामाची दिशा ठरवतात आधुनिक काळात हवामान खाते कितीही अचूक अंदाज देत असते तरीही भेंडवळ घटमांडणीचे महत्त्व मात्र कमी झालेले दिसत नाही.अशा प्रकारे जनतेच्या मनात रूढ असलेली भेंडवडची घटमांडणी सात मे रोजी संध्याकाळी करण्यात येणार आहे तर या मांडणीचे भाकीत ८ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि शारंगधर महाराज हे जाहीर करतील. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येते. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर, पानसुपारी पुरी, पापड, खांडोळी, कुरडई हे खाद्यपदार्थही ठेवले जातात आणि रात्रभर कोणीही या ठिकाणी थांबत नाही. दुसर्या दिवशी पहाटे या घटामध्ये झालेल्या बदलावरून त्याचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. त्यानंतर भाकित वर्तविण्यात येते.त्यावरून शेतकर्यांना पिकांचा आणि पावसाचा अंदाज येतो. कोणत्या महिन्यात पाऊस जास्त तर कोणत्या महिन्यात पाऊस कमी सांगितला आहे, यावरून शेतकरी यंदा कोणत्या पिकाची पेरणी करावी हे ठरवत असतात. पुंजाजी महाराज, शारंगधर महाराज आजही ही परंपरा जोपासतात. याचे नियम पाळतात व घटमांडणी करून भाकिते सांगतात.तत्पूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा गावातील हनुमान मंदिराच्या पारावर पूर्व मांडणी केली जाते. या दोन्हींनी मांडणीमध्ये साम्य असते. त्यामुळे या दोन्ही मांडणीचे निकष एकत्र जोडून हे भाकिते वर्तविली जातात. त्यामुळे यंदा ही घटमांडणी कोणते भाकित वर्तवते याकडे सध्या लक्ष लागून आहे.तीनशे वर्षांपासूनची परंपरातीनशे वर्षांपूर्वी चंद्रभान महाराजांनी भेंडवड येथे या घटमांडणी चा प्रारंभ केला त्या काळात कुठलीही आधुनिक व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे याच घटमांडणी च्या आधारावर शेतकरी विसंबून असत आणि पीक पेरणी करतात त्यामुळे या मांडणीचे अनुभव तंतोतंत खरे खरे ठरत काळाच्या ओघात आता अनेक यंत्रणांचा शोध लागला मात्र तरीही भेंडवड घटमांडणीवरील शेतकऱ्यांचा विश्वास कायम आहे.
रविवारी होणार भेंडळची प्रसिद्ध घटमांडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 1:51 PM