खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३0: जुलै महिन्यात अतवृष्टीमुळे घाटाखालील तीन तालुक्यातील २७0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे अद्यापही न पोहोचल्याने नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहे.या वर्षीच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात अतवृष्टी झाल्यामुळे खामगाव, नांदुरा आणि शेगाव तालुक्यातील २७0 हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके खरडून गेली होती, तर अतवृष्टीमुळे घरांची पडझळ झाली होती. नदी -नाल्यांना पूर येऊन पाणी शेतात घुसल्याने पिके खरडून गेली होती. जणावरे मृत्युमुखी पडली होती. या नैसर्गिक आपत्तीने शेतकर्यांचे नुकसान झाले. या नुकसानाचा प्राथमिक अहवाल तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण करून तयार करावयाचा होता. प्रत्यक्ष कोणत्या शे तकर्यांचे किती नुकसान झाले, याचा पीकनिहाय अहवाल तयार करावयाचा अस ताना अंतिम अहवाल अद्यापही सादर करण्यात आला नाही. यामुळे शेतकर्यांचे किती नुकसान झाले, याची माहिती जिल्हाधिकार्यांना पोहोचली नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
शेतकरी मदतीपासून वंचित!
By admin | Published: August 31, 2016 1:18 AM