लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर: चिखली तालुक्यातील डोंगरशेवली शिवारात सोयाबीन सोंगणीदरम्यान एका शेत मजुराचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाला. ही घटना आठ आॅक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.या घटनेत ३५ वर्षीय गणेश राजाराम खेडवनकर या शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. गणेश राजाराम खेडवनकर हे चार मजुरांसमवेत मळणी यंत्रातून सोयाबीन काढणीचे काम करत होते. दरम्यान, सकाळी काम करत असताना गणेश खेडवनकर यांनी हाताला बांधलेला कापड मळणी यंत्रात ओढल्या गेल्याने त्याच्या सोबत तेही त्यात ओढल्या गेले. त्यातच त्यांच्या शरीराला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. स्थानिकांनी त्यांना तातडीने बाहेर काढले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणेश सावळे यांनी अमडापूर पोलिस ठाण्याला दिली त्यानंतर ठाणेदार वानखेडे व बीट जमादार तोंडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा येथे पाठवले होते. मृत गणेश खेडवनकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, लहान भाऊ आणि आई वडील आहेत. अमडापूर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे डोंगरशेवली गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मळणी यंत्रात अडकून शेतमजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:19 PM
Buldhana, Accident, Farmer सोयाबीन सोंगणीदरम्यान एका शेत मजुराचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाला.
ठळक मुद्दे गणेश राजाराम खेडवनकर या शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.