सिंदखेड राजा : जवळच असलेल्या शिवनी टाका येथील अल्प भु-धारक शेतकरी रामेश्वर किसन तांबेकर (वय ३४) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे रहात्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २८ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. याबाबत मृतक रामेश्वर तांबेकर यांचे काका गजानन तांबेकर यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, रामेश्वर किसन तांबेकर (वय ३४) यांचेकडे दोन एकर शेती आहे. त्यांनी स्टेट बँकेकडून ८५ हजार व महाराष्ट्र बँकेकडून ९८ हजाराचे कर्ज तीन वर्षापूर्वी घेतले होते. परंतु कधी अतीवृष्टी, दुष्काळ, गारपीट, नापिकीमुळे तर वाढत चाललेल्या कर्जामुळे कंटाळून रामेश्वर तांबेकर यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान सहाय्यक ठाणेदार संतोष नेमणार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविले. यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतक रामेश्वरच्या पश्चात पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, आई असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी राजू घोलप, रत्नपारखी, फलटन करीत आहेत.
अल्प भु-धारक शेतकऱ्याची आत्महत्या गळफास घेवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 17:54 IST
सिंदखेड राजा : जवळच असलेल्या शिवनी टाका येथील अल्प भु-धारक शेतकरी रामेश्वर किसन तांबेकर (वय ३४) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे रहात्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २८ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली.
अल्प भु-धारक शेतकऱ्याची आत्महत्या गळफास घेवून
ठळक मुद्देरामेश्वर किसन तांबेकर (वय ३४) यांचेकडे दोन एकर शेती आहे. त्यांनी स्टेट बँकेकडून ८५ हजार व महाराष्ट्र बँकेकडून ९८ हजाराचे कर्ज तीन वर्षापूर्वी घेतले होते. नापिकीमुळे तर वाढत चाललेल्या कर्जामुळे कंटाळून रामेश्वर तांबेकर यांनी गळफास घेवून आत्महत्या केली.