देऊळगाव राजा : सन २०१९-२०२० मध्ये झालेल्या गारपीट व अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेऊनही १२ गावांतील शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहे़त. या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील आणेवारी ४८ पैसे असून काेविड-१९ महामारी आणि गारपीट व अतिवृष्टीने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यातच सन २०१८- १९ व १९-२० मध्ये शासनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी गारपीट व अतिवृष्टीचे अनुदान दिले होते; परंतु या अनुदानापासून संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या उदासीन धोरणामुळे वाकी बुद्रुक ,पिंपरी आंधळे व डोड्रा यांच्यासह बारा गावे लाभापासून वंचित राहिले आहेत. वारंवार मागण्या करूनही महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. या १२ गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी शेतकरी संघटना स्वाभिमानी पक्ष बुलडाणा जिल्हाध्यक्ष बबन चेके यांनी केली आहे.