लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात प्रती हेक्टरी १ लाखाची शेंद्री बोंडअळी अनुदान जाहिर करावे या मागणीसाठी कृषीमंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याघरासमोर शेतकर्यांनी बोंडअळीची होळी केली. जोपर्यंत कृषीमंत्री भेटत नाही तोपर्यत उठणार नाही अशी भूमिका घेत तब्बत चार तास शेतकर्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. संपूर्ण महाराष्ट्रात कपाशीवरील बोंडअळीने शेतकर्यांची उभी पिके उद्धस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधी सोयाबीन गेले अन आता कापूस शेतकर्यांना काय करावे काही सुचेनासे झाले आहे. शेतकर्यांनी आत्मदहनासारखे निवेदने देवूनही सरकारला जाग आली नाही. कापूस कायद्याअंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकर्यांकडून भरून घेत असलेल्या नमुना जी व नमुना एच, नमुना आय मधील जाचक अटी शिथिल करून तत्काळ सरसकट पंचनामे करणे आवश्यक आहे. परंतू शासनाने यामध्ये केवळ वेळकाढू धोरण अवलंबल्याने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. सावकार व बँकांचे कर्जवसूलीसाठी सक्तीचे तगादे सुरु झाले आहे. अर्थसंकटात सापडलेल्या शेतकर्यांना सरकाकडून मदतीचा हात मागण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्यांनी खामगावात कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कृषी मंत्री खामगावात नसल्याने त्यांची भेट होवू शकली नाही. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकर्यांनी जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत न उठण्याचा निर्णय घेतला. तब्बत पाच तास शेतकरी रस्त्यातच ठिय्या देवून बसून होते. शेवटी एसडीओ व तहसिलदार यांनी धाव घेत भूमिका समजून घेवून निवेदन स्विकारले.
सरकारकडून शेतकरी बेदखल औरंगाबाद येथे २४ नोव्हेंंबर रोजी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयासमोर आत्मदहनासारखे आंदोलन करुनही शासन कोणतीही दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे सरकार शेतकºयांच्या मरणावर उठले की काय ? असा सवाल संतप्त शेतकºयांनी व्यक्त केला.
लोकमतने वेधले होते लक्षबोंडअळीच्या प्रार्दुभावाने शेतकरी संकटात या आशयाचे वृत्त लोकमतने २८ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित करून या विषयाकडे लक्ष वेधले होते हे विशेष. बोंडअळीच्या नुकसानीवर प्रकाश टाकल्याबद्दल शेतकºयांनी लोकमतचे आभार मानले.
हेक्टरी १ लाख अनुदान मिळावेझालेल्या नुकसान भरपाईबाबत आम्ही न्याय मागायला आलो. पण आमच्यासोबत कृषीमंत्री बोलायलाही तयार नाही. शेतकºयांसोबत सरकारची भूमिका असंवेदनशिल आहे. बोंडअळीच्या नुकसानभरपाईपोटी सरसकट पंचनामे करून १ लाखाचे शेंद्री बोंडअळी अनुदान मिळावे. - संतोष पाटील जाधव, (शेतकरी नेते तथा अर्थ व बांधकाम सभापती), जि.प.औरंगाबाद.