धाड : अखेरच्या परतीच्या पावसाने खरीपाचा मळणी हंगामाची दैना केली. मात्र नदी नाले भरून वाहिल्याने प्रकल्पांना पुरेसे पाणी आले, यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीपाच्या पिकांची झडती अल्प प्रमाणात आली, त्यात शासनाने निर्धारीत केलेल्या हमीदरापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी झाल्याने उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसला नाही. अशा परिस्थितीत बुलडाणा तालुक्यात रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करत आहे. कमी प्रमाणात पाऊसमान राहिल्याने रब्बी हंगामात हरबरा पेरणी मोठ्या प्रमाणात होणार असे चित्र आहे, या ठिकाणी विराट, डॉलर, जॅकी, यासारखे हरबरा वाण मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे. करडी, बोदेगाव, मासरूळ, ढालसावंगी व शेकापूर या धरणांना समाधानकारक जलसाठा झाल्याने हरबरा पिकासह मका, गहू या पिकांची पेरणीची जय्यत तयारी शेतकरी करताना दिसत आहे. मका, गहू पिकांना लागणारी मेहनत व पाणी भरणा हा हरबरा पिकासह जास्त असून उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात कमी खर्च व उत्पादन जास्त तसेच दर चांगले असे हरबरा पिकाची पेरणीस प्रारंभ झाला आहे. दिवाळी सणापूर्वी सोयाबीन, मका पिकास असणारे अल्प दर, शेतकºयांना नुकसानदेय ठरले, सणासुदीचे काळात हाती पैसा नसल्याने दिवाळी सणावर विरजन पडले. त्यात रब्बीची तयारी, वेळही कमी अशा अवस्थेत शेतकºयांनी शेतशिवारात दिवाळी साजरी केली. नगदी पिक म्हणून असणारे मका पिकास पाणी भरणा करण्यासाठी आवश्यक विज पुरवठा सुरळीत होत नसल्याने भारनियमनाचा परिणाम या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. वारंवार होणारी खंडीत विज, मजुरांची टंचाई यामुळे सरळ सोपे हरबरा पेरणीवर शेतकºयांचा कल आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीचे पैसे दिवाळीपुर्वी शेतकºयांचे खात्यात न पडल्याने त्यांना नव्याने पिककर्ज अजूनही मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. रब्बी हंगामाचे येणारे उत्पादन शेतकºयांना कसे मिळते यावर शेतीचा व्यवसाय ठरलेला असेल. (वार्ताहर)
शेतकरी करत आहे रब्बी हंगामाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:01 PM
धाड : अखेरच्या परतीच्या पावसाने खरीपाचा मळणी हंगामाची दैना केली. मात्र नदी नाले भरून वाहिल्याने प्रकल्पांना पुरेसे पाणी आले, यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीपाच्या पिकांची झडती अल्प प्रमाणात आली, त्यात शासनाने निर्धारीत केलेल्या हमीदरापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी झाल्याने उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसला नाही. अशा परिस्थितीत बुलडाणा तालुक्यात रब्बी ...
ठळक मुद्देपरतीच्या पावसाने प्रकल्पांना पाणी