लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : कर्जमाफीचे फॉर्म भरताना शेतकर्यांना अतिशय त्रास होतो. अनेक शेतकरी मयत आहेत. त्यांचे फॉर्म कोणी भरावे हा प्रश्न निर्माण होत आहे. तर तालुक्या तील सरकारी बँकामध्ये बँक कर्मचारी शेतकर्यांना हीन दर्जाची वागणूक देवून त्रास देत आहेत, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ११ सप्टेंबर रोजी स्थानिक तहसीलदार मगर यांच्याकडे करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजु भोंगळ, राकाँ नेते मनोहर पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप उगले, भास्कर ठाकरे, तालुका अध्यक्ष प्रशांत दाभाडे, युवक तालुकाध्यक्ष राजु राज पूत, शहराध्यक्ष जावेदभाई, एजाजभाई, फिरोजभाई, संदीप दंडे, प्रकाश घोंगटे, संदीप ढगे, गणेश उमाळे, रामदास गावंडे, अताउल्लाखान, शे.रहेमतउल्ला शे.महंमद यांचेसह राकाँ तालुका व शहर कार्यकत्यार्ंची उपस्थिती होती.यावेळी वरील मागण्यांसह तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत, तहसील कार्यालयात तथा कृषी कार्यालयात नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, विधवा स्त्रीयांना गॅस सिलींडर द्यावे इत्यादी मागण्या सुध्दा करण्यात आल्या.
असंवेदनशीलतेचा आरोपयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्य सरकार शे तकर्यांच्या बाबतीत असंवेदनशिल असून त्यांच्या समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बद्दल शासनाचा निषेधही नोंदविण्यात आला आहे.