लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर ५ महिने उलटूनही या कर्जमाफीत पात्र शेतकर्यांची नावे अद्यापपर्यंत जाहीर केलेली नाही. भडगाव येथील दिलीप जवंजाळ यांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केलेला आहे; परंतु त्यांना कर्जमाफी झाली किंवा कसे, हे कळू शकले नाही, तर कर्जमाफीच्या संभाव्य यादीत त्यांचे नाव आहे किंवा नाही, हेही कळायला मार्ग नसल्याने त्यांनी कंटाळून आत्महत्या केली. जर कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या असत्या तर भडगावची ही आत्महत्या कदाचित टळू शकली असती, अशी खंत आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केली. चिखली मतदार संघातील भडगाव येथील ४0 वर्षीय शेतकरी दिलीप जवंजाळ यांनी कर्जबाजारी झाल्याने व मुला-मुलींचे शिक्षण, मुलीचे लग्न यासाठी आर्थिक तरतूद होत नसल्याने कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. दिलीप जवंजाळ हे शेतकरी कर्जबाजारीपणाच्या या विवंचनेमुळे मागिल दोन महिन्यांपासून त्रस्त होते, त्यातच शेतीतून आलेले अल्प उत्पादन व त्याला बाजारात भाव नसल्याने त्रस्त झाले होते. कर्जासाठी त्यांनी जमीन विकायला काढली होती; परंतु जमिनीलाही ग्राहक मिळत नसल्याने अखेर त्यांनी आत्महत्या केली. हे वृत्त कळताच आ.राहुल बोंद्रे यांनी मृत दिलीप जवंजाळ यांच्या कुटुंबीयांची सात्वंनपर भेट घेतली. दरम्यान, शासनाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य या कुटुंबीयाला लवकरात लवकर मिळावे, याबाबत आ.बोंद्रे यांनी तहसीलदार, तलाठी, रुग्णालय येथे दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व संबंधितांशी चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या., यावेळी आ.बोंद्रे यांच्यासमवेत अंकुश डहाके, सुनील देशमुख, डॉ. संजय घुगे, सरपंच केशव साखरे, साखरे, भानुदास पाटील, मधुकर साखरे, नितीन तायडे, मदन पठारकर आदी उपस्थित होते.
..तर भडगावची शेतकरी आत्महत्या टळली असती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:54 AM
कर्जमाफीच्या संभाव्य यादीत त्यांचे नाव आहे किंवा नाही, हेही कळायला मार्ग नसल्याने त्यांनी कंटाळून आत्महत्या केली. जर कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या असत्या तर भडगावची ही आत्महत्या कदाचित टळू शकली असती, अशी खंत आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केली.
ठळक मुद्देकर्जमाफीच्या याद्या जाहीर न झाल्याने राहुल बोंद्रेंनी व्यक्त केली खंत