- संदीप वानखडेलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : खरीप हंगाम संपत आल्यावरतही ३९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे. १५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच जवळपास ४५ हजार शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.गत काही वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच गेल्या वर्षी काेराेनामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले़ परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या साेयाबीनला काेंब फुटले हाेते. लाॅकडाऊनमुळे व्यापारी गावापर्यंत पाेहचू शकले नाही. त्यामुळे, काही व्यापाऱ्यांनी कमी भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला. काेराेनाच्या सावटात यावर्षी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. गरज असताना पीक कर्ज मिळेल अशी आस शेतकऱ्यांना हाेती. मात्र, हंगाम संपत असतानाही ३९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, उर्वरीत शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज वाटप करण्याची गरज आहे. सप्टेंबर अखेर पर्यंत कर्ज वाटपाची मुदत आहे.
खरीप हंगाम संपत आल्यावरही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 11:00 AM