शेतकरी आयुष्यभर शेतात राबराब राबून अनंत अस्मानी तथा सुलतानी संकटांवर मात करीत जगासाठी अन्नधान्य पिकवितो. म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटल आहे. भारताचे माजी पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांचा वाढदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या शेतकरी दिनी माय-बाप अन्नदात्याचा सन्मान म्हणजे बळीराजाप्रती कृतज्ञता होय, असे प्रतिपादन शेतकरी सन्मानप्रसंगी प्रदेश सचिव राम डहाके यांनी केले. यावेळी प्रगतशील तथा प्रयोगशील शेतकरी रमेशकाका पाटील, जनार्दन डांगे, गजानन वऱ्हाडे, श्रीकृष्ण वऱ्हाडे, मधुकरराव ढोके, विष्णू बोंद्रे, नारायणराव गोराडे तथा तरुण शेतकरी गणेश पारखेडे, गोविंदा जगताप यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सन्मान करत सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष गजानन मापारी, रवी तरळकर, सुनील राठोड, नीलू पाटील, वसीमखाँ पठाण, सय्यद सौराब, इलियास, गोपाल शिंदे, शुभम लाड, रमजान, सतीश डहाके, गोपाल उगवेकरसह शेतकरी बांधव व गावकरी उपस्थित होते.
अमडापुरात शेतकऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:28 AM