साखरखेर्डा येथील गजानन वसंता मंडळकर यांच्याकडे ५ एकर शेती आहे . या पाच एकरात तीन एकर सोयाबीन , एक एकर पपई , आणि ३० गुंठ्यांत हळद व सोयाबीन ही पिकं खरीप हंगामात घेतली . ३० गुंठे शेतात हळद आणि अंतर पीक म्हणून सोयाबीन पेरले . सोयाबीनची काढणी काढली असता त्यांना ६ क्किंटल सोयाबीन चे उत्पादन झाले . मागिल महिन्यात हळदीची काढणी केली असता ओली हळद ८० क्किंटल निघाली . ती बाॅयलर मधून काढून ती हळद वाळवावी लागते . वाळल्या नंतर रोलर ग्रेडर मधून बाह्य आवरण काढण्यात येते . ही संपुर्ण प्रक्रीया केल्यानंतर हळदिच्या वजनात ७० टक्के वजनात घसारा होवून त्या हळदीचे वजन ३० टक्के राहते . ओली हळद काढणीच्या वेळी ८० क्किंटल जरी असली तरी प्रत्यक्षात तीचे वजन २० ते २२ क्किंटल अपेक्षीत असते . पेरणी पासुन ते संपूर्ण प्रक्रीया होईपर्यंत शेतकऱ्याला ५५ हजार रुपये खर्च येतो . आज हळदीला बाजारात चांगले भाव असून १० हजार रुपये क्विंटल भाव अपेक्षित आहे . २० क्किंटल हळदीचे २ लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे . याच ३० गुंठ्यांत अंतर पीक म्हणून सोयाबीन ची पेरणी केली होती . उन्नत शेतीच्या माध्यमातून त्यांनी ६ क्किंटल सोयाबीन चे उत्पादन घेतले . तीन एकरात ही सोयाबीनची पेरणी केली असता एकरी ११ क्किंटलाचे उत्पादन त्यांनी घेतले . सोयाबीन इतरांच्या शेतात काळे पडले असता , केवळ नियोजनबद्ध आखणी केल्याने त्यांच्या सोयाबीनला डागही लागला नाही . विशेष म्हणजे जून महिन्यात पेरणीसाठी हे सोयाबीन बिजवायीसाठी योग्य असल्याने कंपणीने सोयाबीनची उचल केली आहे . पंपई बाग घेतांना नियोजन तर होतेच परंतू स्वतः: मार्केटिंग केल्याने दररोजचा खर्च या पपई मुळे भागला आहे . सोयाबीन नंतर रब्बी हंगामात त्यांनी गहू , हरबरा ही पीकेही घेतली आहेत .
--------------------------------------------
उन्नत शेतीच्या माध्यमातून त्यांनी शेती केल्यामूळे उत्पादनात भर पडली आहे . योग्यवेळी मार्गदर्शन हेही त्यांच्यासाठी महत्वाचे ठरले आहे .
* समाधान वाघ
कृषी सहायक , साखरखेर्डा
-------------------------------------------------
शेती हा व्यवसाय जिद्द चिकाटी आणि मेहनत असली की उत्पादनात वाढ होते . नैसर्गिक संकटे ही येतातच त्या संकटांना न डगमगता कृषी अधिकारी , कृषी सहायक यांचे मार्गदर्शन ही तितकेच महत्वाचे आहे .
कॅप्शन :--- शेतात वाळत घातलेली हळद (२), पेरणी नंतर हळदीचे हिरवेगार शेत