- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: यावर्षी सुरूवातीपासूच दमदार पाऊस पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन वाढले; परंतु मालाची प्रतवारी पार घसरल्याने अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या पदरी निराशाच आली आहे.
गत चार वर्षांपासून शेतकºयांनी कोरडा दुष्काळ अनुभवला. पाऊसच नसल्याने शेतीत उत्पादन झाले नाही. यावर्षी सुरूवातीपासूनच पाऊस चांगला पिकांची वाढ चांगली झाली. खासकरून सोयाबीन उत्पादक शेतकºयांना मोठी आशा होती. परंतु गत महिन्यात झालेल्या अति पावसामुळे सर्व पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकºयांच्या शेतात सोयाबीनला कोंब फुटले. परंतु ज्या शेतकºयांच्या शेतात सोयाबीन उभे होते, त्यांच्या पिकाची काढणी सध्या सुरू आहे. गत १५ दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. यावर्षी अनेक शेतकºयांना एकरी ५ ते ७ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे सध्या करण्यात येत असलेल्या सोयाबीनच्या काढणीवरून दिसून येते. परंतु सोयाबीनची प्रतवारी प्रचंड घसरलेली दिसून येत आहे. बाजारात मोजके सोयाबीन सोडले, तरी बहुतांश शेतकºयांच्या सोयाबीनला हजार ते १५०० रूपये प्रतिक्विंटलचे भाव मिळत आहेत. शिवाय सोयाबीन ओलसर असल्याने ते वाळायला टाकण्याचे आव्हानही शेतकºयांसमोर आहेच. गतवर्षी सोयाबनीची झडती एकरी दोन क्विंटलच्या वर नव्हती. बहुतांश शेतकºयांनी सोयाबीनची काढणीही न करता शेतात थेट रोटावेटर मारले होते. त्यामुळे गतवर्षीच्या मानाने यावर्षी सोयाबीनची झडती बºयापैकी आहे, मात्र भाव अत्यल्प मिळत असल्याने उत्पादन असून-नसून काहीही फायदा होत नसल्याचे दिसून येते. एकीकडे सोयाबीन ४ हजार रूपये प्रतिक्विंटलचे भाव अपेक्षित असताना, मालाची प्रतवारी खराब असल्याने केवळ २५ टक्के किंमतीतच सोयाबीनची विक्री होत आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकºयांचे सरासरी ७५ टक्के नुकसान झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचा विचार न करता त्यातून शेतकºयांचे होणारे प्रचंड नुकसान लक्षात घेता, यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकºयांना विम्याचा लाभ मिळण्याची नितांत गरज आहे. (प्रतिनिधी)