लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू आहे. त्यासाठी जमिनी ओलीत करण्याची कामे सुरू असताना शेतातील विद्युत पुरवठा दिवसभर खंडित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे शे तकर्यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यावे लागत आहे. रब्बी हंगामावर महावितरणची वक्रदृष्टी असल्याने रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकर्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांना दरवर्षी रब्बी हंगामात फटका बसतो; मात्र यावर्षी महावितरणच्या अजब कारभाराने शेतकरी त्रस्त झाले आहेत. मृग नक्षत्रात सुरुवातील झालेल्या पावसावर मूग, उडीद, सोयाबीन ही खरीप हंगामातील पिके कशीबशी आली. त्यानंतर परतीच्या पावसाने जलपातळीत वाढ झाली असून, अनेक नदी, नाले, तलावातील पाणी साठा वाढला. या पाणी साठय़ाच्या भरवश्यावर शेतकर्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली आहे. सध्या जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या गहू, हरबरा पेरणीला सुरुवात झाली आहे; मात्र खरिपाचा कस रब्बी हंगामात भरून काढण्याच्या तयारीत असलेल्या शे तकर्यांना वीज वितरणशी संघर्ष करावा लागत आहे. परतीच्या पावसाने यावर्षी पाणीसाठय़ात वाढ झालेली असल्याने रब्बी हंगामाला पूरक इतका पाणीसाठी बहुतांश तालुक्यात उपलब्ध आहे; परंतु मुबलक पाणीसाठा असूनही विद्युत पुरवठय़ाअभावी ते रब्बी पिकाला पुरवले जाऊ शकत नाही. रब्बी हंगामातील गहू पेरणीच्या सुरुवातीला अनेक शेतकरी शेतजमीनीला विद्युत पं पाच्या सहाय्याने पाणी देतात. तसेच तूर पीकही चांगले बहरलेले आहे. रब्बी हंगामातील या सर्व पिकांना पाण्याची आवश्यकता आहे; परंतु ऐनवेळी वीज कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे तसेच १६ ते १७ तासाचे शेतात भारनियमन केल्यामुळे रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकर्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. काही शेतकर्यांनी विद्युत बिल भरले नसल्याने विद्युत कनेक्शन कापण्यात आले आहे; मात्र ज्या शे तकर्यांनी विद्युत बिल भरलेले असते त्यांच्याही शेतातील विद्युत कनेक्शन बंद आहे. १0 ते १५ शेतकर्यांचे विद्युत कनेक्शन हे एका विद्युत रोहित्रावर असल्याने विद्युत बिल न भरलेल्या शे तकर्यांचे विद्युत कनेक्शन कापताना विद्युत रोहित्रावर असलेल्या सर्वच शेतकर्यांना त्याचा फटका बसत आहे. रब्बी पिकाला पाणी देण्यासाठी शेतकर्यांसमोर भारनियमनाचा खोडा निर्माण होत आहे.
पाणी साठा असूनही रब्बी हंगाम धोक्यातजिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकर्यांना रब्बीची आस आहे. यासाठी अनुकूल वातावरण असून, जिल्ह्यातील छोट्या-मोठय़ा लघू प्रकल्पामधील पाणी साठासुद्धा वाढलेला आहे; परंतु विद्युत वितरण कंपनीकडून शेतीसाठी वेळेवर विद्युत पुरवठा पुरवल्या जात नसल्याने रब्बी हंगामाचे चित्र धोक्यात दिसून आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे मुबलक पाणी साठा असतानाही शेतकर्यांना त्याचा वापर करता येत नाही.