बुलडाणा : खरीप हंगामाचा पीक विमा काढण्याची अंतीम तारीख जवळ येत आहे. त्यामुळे सध्या पीक विमा काढण्यासाठी शेतकºयांची लगबग सुरू आहे. बँकेसह महा ई सेवा केंद्रावर शेतकºयांची एकच गर्दी होत असल्याचे दिसून येते. शासनाने खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत शेतकºयांनी सहभागी होण्याची अंतिम मुदत सर्व अधिसूचित पिकांकरिता बिगर कर्जदार शेतकºयांसाठी २४ जुलै आहे. तर कर्जदार शेतकºयांसाठी ३१ जुलै आहे. कर्जदार शेतकºयांना पीक विमा बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकºयांना एच्छिक ठेवण्यात आली आहे. कर्जदार शेतकºयांचा विमा हप्ता बँकेमार्फत भरला जाणार आहे. तर बिगर कर्जदार शेतकºयांना विहित केलेल्या अर्जासह विमा हप्ता विहित कालावधीमध्ये बचत खाते असलेल्या बँकेच्या शाखांमध्ये भरणा करावा लागणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात राबविण्याकरिता आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पुणे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील नऊ पिके प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. शेतकºयांनी भरावयाचा विमाहप्ता हा विमा संरक्षित रकमेच्या कापूस पिकासाठी पाच टक्के व इतर पिकांसाठी दोन टक्के आहे. मूग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १७ हजार ५०० रुपये तर शेतकरी हिस्सा ३५० रुपये प्रति हेक्टर आहे. उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम १७ हजार ५०० तर शेतकरी हिस्सा ३५० रुपये, सोयाबीन पीकासाठी संरक्षित रक्कम ४२ हजार रुपये तर शेतकरी असा ८४० रुपये, कापूस पिकासाठी संरक्षित रक्कम ४२ हजार रुपये तर शेतकरी हिस्सा २ हजार १०० रुपये, तूर पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३१ हजार ५०० रुपये तर शेतकरी हिस्सा ६३० रुपये, ज्वारी साठी विमा संरक्षित रक्कम २० हजार ७५० रुपये व शेतकरी हिस्सा ४१५ रुपये आहे. मका पिकासाठी विमा संरक्षित रक्कम २६ हजार २०० रुपये व शेतकरी हिस्सा ५२४ रुपये, तीळ पिकासाठी विमा संरक्षित रक्कम २२ हजार रुपये व शेतकरी हिस्सा ४४० रुपये आहे. भूईमूंग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३० हजार रुपये व शेतकरी हिस्सा ६०० रुपये आहे. (प्रतिनिधी)
अर्जासाठी आॅनलाईन पद्धत
शेतकºयांना पीक विम्याचे अर्ज भरण्यासाठी आॅनलाईन पद्धत उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकºयांना अर्ज भरण्यास सुलभता यावी, म्हणून गावपातळीवर पुरक नोंदणी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकºयांचे अर्ज पीक विमा हप्ता आॅनलाईन पद्धतीने स्किारण्यास मान्यता देण्यात आलेली असल्याने शेतकºयांसाठी सोईचे झाले आहे.