खामगाव, दि. ३१- खरिप हंगामातील विविध पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील ९ हजार नुकसानग्रस्त शेतकर्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. खरिप हंगामातील मुग, उडीद, सोयाबिन, कापूस, ज्वारी आदी पिकांचा विमा उतरविण्यासाठी शासनाने राज्यात विविध विमा कंपन्यांची निवड केली आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीकडे बुलडाणासह ११ जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतवृष्टीमुळे मुग, उडीद व सोयाबिन या पिकांचे नुकसान झाले. तर परतीच्या पावसाने ज्वारी आणि सोयाबिन पिकाला फटका दिला आहे. परिणामी जिल्ह्यातील ९ हजार शेतकर्यांनी कृषी विभागासह रिलायन्स जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीकडे पिक नुकसानीबाबत तक्रार दाखल केली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात सर्वाधिक २२५ शेतकर्यांनी विमा कंपनीकडे पिक विमा नुकसानीची तक्रार केली आहे. विमा कंपनीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कंपनीने कृषी विभागाकडून माहिती मागविली आहे. शेतकर्यांच्या तक्रारीनुसार नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहेत. कृषी विभागसुध्दा कंपनीकडून पंचनामे करुन घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
शेतक-यांची विमा कंपनीकडे धाव
By admin | Published: November 01, 2016 12:11 AM