लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तालुक्यातील तराडखेड येथील शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य, विनायका सिड्चे मालक डॉ. हासनराव शंकरराव देशमुख यांचे २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३0 वाजता हृदयविकाराने निधन झाले. सायंकाळी फिरण्यासाठी गेले असता त्यांना चक्कर आल्याने सोबतच्या काही सहकार्यांनी त्यांना त्वरित सहयोग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूसमयी ते ७0 वर्षांचे होते. सोमवारी तराडखेड येथे सकाळी १0 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. हासनराव देशमुख यांची शेती तज्ज्ञ म्हणून ओळख होती. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वातंत्र भारत पक्षातर्फे १९९५ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांच्या निधनामुळे शेतकरी संघटनेचा सच्चा आंदोलक, शरद जोशी यांचे खंदे सर्मथन गमावल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे राज्यकार्यकारिणी सदस्य नामदेवराव जाधव, डॉ. बाबुराव नरोटे, नरेश शेळके यांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा विनायका सिड्सचे व्यवस्थापकीय संचालक अँड. सुनील देशमुख, दोन मुली, सून, नात, नातू असा आप्त परिवार आहे.-
शेतकरी संघटनेचे नेते हासनराव देशमुख यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:35 AM
बुलडाणा: तालुक्यातील तराडखेड येथील शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य, विनायका सिड्चे मालक डॉ. हासनराव शंकरराव देशमुख यांचे २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३0 वाजता हृदयविकाराने निधन झाले.
ठळक मुद्दे सायंकाळी फिरण्यासाठी गेले असता आला हृदयविकाराचा झटकाउपचारांपूर्वीच मालवली प्राणाज्योत