शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शेतकरी करणार परदेशी पिकांचा अभ्यास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:12 AM

बुलडाणा : उत्पादित होणार्‍या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा  करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात अवलंब करणे  गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागातर्फे परदेशी पिकांचा अभ्यास  करण्यासाठी राज्यातील शेतकर्‍यांना संधी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ८८ शेतकरी परदेश दौर्‍यासाठी उत्सुक दोन अर्ज अपात्र 

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उत्पादित होणार्‍या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा  करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात अवलंब करणे  गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागातर्फे परदेशी पिकांचा अभ्यास  करण्यासाठी राज्यातील शेतकर्‍यांना संधी देण्यात आली आहे.  त्यासाठी कृषी विभागाकडून शेतकर्‍यांचे जिल्हा स्तरावर प्रस्ताव  मागविण्यात आले होते. विविध देशांनी विकसित केलेले शे तीविषयक तंत्रज्ञान व शास्त्रज्ञांकडून माहिती जाणून घेण्यासाठी  जिल्ह्यातील ८८ शेतकर्‍यांनी  उत्सुकता दर्शवली असून, यामध्ये  दोन शेतकर्‍यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. शेतीच्या समृद्धीसाठी शेतकर्‍यांना शेतीसंबंधी आधुनिक माहिती  उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. देशातीत नागरिक शेती व  शेतीशी संबंधी रोजगारावर अवलंबून आहे. शेतकर्‍यांनी आ पल्या चाकोरीच्या बाहेर पडून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर  करून शेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढवावे, शेतीच्या  समृद्धीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, पारंपरिक पद्ध तीने पीक घेण्याच्या पद्धतीमुळे पिकाचे उत्पन्न कमी येते म्हणून  शेतकर्‍याने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास उत् पादनात निश्‍चित वाढ होते. देशातील साक्षर पिढी शेती व्यवसायात  उतरत आहे. त्यामुळे शेती व्यवसायात होत असलेल्या नवनवीन  बदलांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.   यांत्रिकीकरणाच्या वापरामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होऊन  कामाची गुणवत्ता सुधारते. यासाठी शेतकर्‍यांना विविध देशांतील  तंत्रज्ञान कळावे, या उद्देशाने शेतकर्‍यांसाठी देशाबाहेरील  अभ्यास दौरा होणार आहे. कृषी विभागाच्यावतीने सन २0१७- १८ या वर्षासाठी इस्रायल, र्जमनी, नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया  याप्रमाणे अभ्यास दौर्‍यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. या  दौर्‍यात सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना खर्चाच्या ५0 टक्के किंवा  जास्तीत जास्त एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल, ते  अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. या दौर्‍याचा लाभ  घेणार्‍या शेतकर्‍यांकडे पासपोर्ट, विमा पॉलिसी, स्वत:चे नाव  असलेला सात-बारा आणि नमुना आठ अ असणे आवश्यक  आहे. त्यासाठी इच्छुक शेतकर्‍यांचे प्रस्ताव तालुका कृषी  अधिकार्‍यांकडे मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील  ८८ शेतकर्‍यांनी परदेश दौर्‍यासाठी उत्सुकता दर्शवली आहे.  यामध्ये दोन शेतकर्‍यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. शेतकर्‍यांना  परदेश दौर्‍याची ही संधी उत्पादित होणार्‍या शेतमालाचा दर्जा  सुधारण्यासाठी चांगली फायद्याची ठरणार आहे. 

परदेश दौर्‍यासाठी आज होणार लॉटरी! शेतकर्‍यांनी उत्पादन वाढीबरोबरच उत्पादकता, शेतीमालाचा  दर्जा, कृषी प्रक्रिया, कृषी उत्पादनाचे ग्रेडिंग, प्रतवारी,  साठवणूक, पॅकेजिंग व ब्रँड विकसित करून शेतीमालाचे  यशस्वी विपणन करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी शे तकर्‍यांना जगातील उत्कृष्ट नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी,  यादृष्टीने राज्यातील शेतकर्‍यांचे शासनाच्या कृषी विभागामार्फत  परदेशात अभ्यास दौरा काढण्यात येणार असून, त्याकरिता  जिल्ह्यातून ८८ शेतकर्‍यांचे प्रस्ताव कृषी विभागाकडे आले  आहेत. सदर प्रस्तावांना क्रमवारी निश्‍चित करण्यासाठी १६ ऑ क्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा प्रशिक्षण केंद्र धाड रोड  बुलडाणा येथे लॉटरी काढण्यात येणार आहे.

व्यावसायिक असल्यास अर्ज ठरणार अपात्रपरदेश दौर्‍यासाठी कृषी विभागाकडून विविध नियम व अटी  ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रस्ताव सादर करणार्‍या शे तकर्‍यांचा वयोगट २५ ते ६0 वर्षे ठेवण्यात आलेला आहे.  त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन हे शेती असावे. तसेच शासकीय,  निमशासकीय, सहकारी संस्थेत नोकरीस, वैद्यकीय क्षेत्रातील  डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार आदी व्यावसायिक  असल्यास सदर अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे.  

टॅग्स :agricultureशेती