चिखली : कोणत्याही परिस्थितीत धीर न सोडता प्रयत्नांची पराकाष्ठा करत शेतकरी जिद्दीने मेहनत करीत असतात, ही बाब प्रत्येकाने शेतकऱ्यांकडून शिकली पाहिजे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्या जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा त्यांनी सत्कार केला.
चिखली तालुक्यातील मंगरूळ (इ) येथील शेतकरी प्रल्हाद संपत गवते यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार मिळाला तर मलगी येथील अनिता रामसिक.............. पवार व रामसिंग............. पवार या दाम्पत्यालादेखील स्व. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरमध्ये रविकांत तुपकरांनी यथोचित सत्कार केला. इतर शेतकऱ्यांना नवी दिशा आणि प्रेरणा देण्याचे काम या शेतकऱ्यांनी केले आहे, अशा शब्दात तुपकरांनी या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे कौतुक केले. यावेळी अॅड. शर्वरी तुपकर, चिखली तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, पं. स. कृषी अधिकारी सोनुने, मंडळ अधिकारी देशमुख, अंभोरे, पवार, वाणी, अतुल खरोडे यांच्यासाह बुलडाणा व चिखली तालुक्यातील आदर्श शेतकरी व सरपंच यांच्यासह राणा चंदन, रामेश्वर अंभोरे, पवन देशमुख, आकाश माळोदे, हरिभाऊ उबरहंडे आदी स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.