बुलडाणा : पावसाचे असामान विभाजन, त्याची अनियमितता पेरणीच्या हंगामात निश्चितच व्यत्यय आणणारी ठरू शकते, यासाठी शेतकरी बंधूंनी पेरणी करताना सलग दोन-तीन दिवस पुरेसा पाऊस पडल्यावर ( ७५-१०० मि.मी. ) व जमिनीत उपयुक्त ओल याची खात्री करूनच पेरणी करावी, असे प्रतिपादन कृषी हवामान तज्ज्ञ, मनेश यदुलवार यांनी केले. कृषी मौसम सेवाअंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यांनी चिखली तालुक्यातील सवणा गावातील शेतकऱ्यांशी त्यांच्या बांधावर जाऊन २१ जून रोजी संवाद साधला. यावेळी ते बाेलत हाेते़
यावेळी जिल्हा कृषी हवामान केंद्र, बुलडाणाचे मनेश यदुलवार (कृषी हवामान तज्ज्ञ), अनिल जाधव (कृषी हवामान निरीक्षक), तसेच कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणाच्या कृषी शास्त्रज्ञ डॉ. जगदीश वाडकर उपस्थित होते.
पीक प्रात्यक्षिकाचे महत्त्व व त्याचे शेती उत्पादनात होणारे फायदे यावर सखोल मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञ डॉ. जगदीश वाडकर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी कृषी सहायक अमोल बाहेकर, तसेच सवणा येथील विजय भुतेकर, ज्ञानेश्वर शेळके, पद्माकर भुतेकर, राजेद्र भुतेकर, विठ्ठल पवार, राहुल पवार यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना मनेश यदुलवार, कृषी हवामान तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा डॉ. जगदीश वाडकर, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा.कृषी सल्ल्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
ग्रामीण कृषी मौसम सेवाअंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा यांच्याद्वारे दर मंगळवारी आणि शुक्रवारी हवामान अंदाजावर आधारित तालुकानिहाय आणि पीकनिहाय कृषी सल्ला पत्रिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाते. त्यासोबतच विस्तारित हवामान अंदाज प्रणालीच्या माध्यमातून दोन आठवड्यांचा पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना दिला जातो. मोठ्या संख्येने शेतकरी वर्गाने या कृषी सल्ला पत्रिकेचा लाभ घ्यावा व शेतीचे उत्तमोत्तम व्यवस्थापन करावे, असे आवाहन यदुलवार यांनी यावेळी केले.