लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णा : शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीने दुसर्या टप्प्यातील आक्रमक आंदोलनाची घोषणा केली असून, या आंदोलनाचा बिगुल सोमवार, १४ ऑगस्ट रोजी खामगाव येथून फुंकला जाणार आहे. यामध्ये खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात टेंभुर्णा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.राज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी असून, कठीण निकष व अटी लावल्याने पाच टक्के शेतकर्यांनासुद्धा या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असे सुकाणू समितीचे मत आहे. करिता शेतकर्यांना केवळ कर्जमाफी नको असून, संपूर्ण कर्जमुक्ती हवी आहे. शेतकर्यांना सरसकट विनाअट कर्जमुक्ती द्यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतीमालाला उत्पादन खर्च व ५0 टक्के नफा याप्रमाणे हमीभाव द्यावा तसेच सुकाणू समितीने सादर केलेल्या मागणीपत्रातील मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी सोमवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील टेंभुर्णा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर, राणा चंदन आदींचीसुद्धा उपस्थिती राहणार आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून सरकारने शेतीमालाच्या भावात शेतकर्यांना लुटले. त्यामुळे कर्जमुक्ती हा शेतकर्यांचा नैतिक अधिकार आहे. तरी शेतकर्यांनी घरच्या भाकरी सोबत घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सुकाणू समितीचे दादा रायपुरे, कैलास फाटे, जितेंद्र चोपडे आदींनी केले आहे.
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकर्यांचा आज ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:12 AM
टेंभुर्णा : शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी सुकाणू समितीने दुसर्या टप्प्यातील आक्रमक आंदोलनाची घोषणा केली असून, या आंदोलनाचा बिगुल सोमवार, १४ ऑगस्ट रोजी खामगाव येथून फुंकला जाणार आहे. यामध्ये खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात टेंभुर्णा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देराजू शेट्टी करणार नेतृत्व कर्जमाफीसाठी सुकाणू समिती आक्रमक