बुलडाणा : शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा, याकरीता राज्यातील प्रमुख ४० शहरांमध्ये शेतकरी आठवडी बाजार संकल्पना पहिल्या टप्प्यात राबविण्यात आली होती; परंतु पश्चिम विदर्भातील शेतकरी आठवडी बाजारच वांध्यात आहेत. वºहाडातून केवळ बुलडाणा शहरात तीन वर्षापूर्वी सुरू झालेला हा बाजार काही दिवसातच बंद पडला. यामुळे शेतकऱ्यांना पडेल त्या दरात आपला भाजीपाला विक्री करण्याखेरीज पर्याय राहिला नाही.दलालमुक्त बाजार व्यवस्था निर्माण करण्यासोबतच शेतकºयांच्या भाजीपाल्याला चांगला भाव मिळावा, त्यांची लूट थांबावी याउद्देशाने आठवडी बाजार सुरू करण्यात आले होते. अमरावती विभागामध्ये केवळ बुलडाणा याच ठिकाणी हा बाजार सुरू करण्यात आला होता. काही दिवसातच तो बाजार बंद झाला. अमरावती विभागामध्ये कुठेच शेतकरी आठवडी बाजार सुरू नाही. परिणामी शेतकºयांना आपला भाजीपाला मिळेल त्या भावात विक्री करावा लागत आहे.याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटना व शेतकºयांनी या नववर्षाच्या सुरूवातीलाच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुकट भाजीपाला वाटप करून रोष व्यक्त केला होता. सध्या भाजीपाला वर्गीय पिकांचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. बाजार समित्यांच्या काही जाचक अटींमधून शेतकºयांची मुक्तता करण्यासाठी राज्य सरकारने आठवडी बाजार सुरू केले. ताज्या व रास्त दरातील भाज्यांना चांगली मागणीही असते. त्यामुळे आज शेतकरी आठवडी बाजार सुरू होण्याची अपेक्षा भाजीपाला उत्पादक शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.
पालेभाज्यांच्या दरातून निघेना वाहतूकीचा खर्चसध्या पालक, मेथी, कोथिंबीर यासारख्या पालेभाज्यांना अत्यंत कमी दर मिळत आहेत. अवघा एक रुपया ते पाच रुपयांपर्यंत प्रति किलो दर या भाज्यांना मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांना पालेभाज्या विक्रीतून वाहतूकीचा खर्चही निघत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील बाजारांमध्ये दिसून येत आहे.असे आहेत शेतकरी आठवडी बाजाराचे फायदेशेतकºयांमार्फत थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीची संधी. कृषी माल शेतातून थेट बाजारात येत असल्याकारणाने काढणीनंतरच्या होणाºया नुकसानीत मोठी घट. रोख स्वरूपात १०० टक्के मालाची रक्कम थेट शेतकºयाच्या हातात. आपल्या मालाचा बाजार भाव ठरविण्याचा अधिकारी शेतकºयाला.