बुलडाणा: जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबाकरिता विशेष घटक योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे व शेळी वाटप करण्यात येणार आहे. १५ जुलैपासून ते १४ ऑगस्टपर्यंत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात ही प्रक्रिया पार पडणार आहे. दुधाळ जनावरे, शेळी गटासाठी एका कुटुंबातील केवळ एकाच लाभार्थीनी अर्ज करावा, अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील व दारिद्रय़रेषेखालील असावा, अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याने सदर योजनेचा याआधी लाभ घेतलेला नसावा, ही योजना ७५ टक्के शासकीय अनुदान व २५ टक्के बँकेचे अर्थसहाय्य अशा स्वरूपाची असल्यामुळे अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा, अर्जदारास १ मे २00१ नंतर तिसरे अपत्य नसावे याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा, नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो जोडावा, अर्जदाराने जागा असल्याबाबत सातबारा किंवा नमुना ८ जोडणे आवश्यक आहे.
शेतक-यांना मिळणार दुधाळ जनावरे!
By admin | Published: July 08, 2016 12:37 AM