बुलडाणा : बुलडाणा जिल्हा शासकिय नळपाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ११ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण व त्यांच्या सहकाऱ्यांनी साखळी उपोषणास सुरुवात केली. राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाला भेट देऊन पाठींबा व्यक्त केला. पाणीपुरवठा योजना सुरळीत करुन नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे यासाठी समितीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान बुधवारपासून प्राणंतिक उपोषण व साखळी उपोषण सुरु करण्यात आले. समितीच्या मागण्यावर विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची कार्यवाही झाली पाहिजे, शासकीय नळपाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराबाबत गुन्हे दाखल करावे, प्रत्येक गावात दररोज पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, १४० गाव पाणीपुरवठा योजना पुर्ण करा, किडनीच्या आजाराने मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबास शासनाने ४ लाख रुपये रोख मदत द्यावी, किडनी व मुतखडा आजाराच्या उपचारासाठी सुविधायुक्त आरोग्य केंद्रे उभारावी, पिण्याचे पाणी विकत घेणाऱ्या ग्रामस्थांना शासकीय पाणीभत्ता द्यावा, रस्ते भ्रष्टाचाराबाबत गुन्हे दाखल करा, जिल्हास्तरावर वार्षिक भ्रष्टाचाराचा आढावा असा उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी राबवावा आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरु करण्यात आले. माजी आमदार दिलीपकूमार सानंदा, संजय राठोड, राधेश्याम चांडक, अॅड. साहेबराव सरदार, बद्री वाघ, शिवदास रिंढे, अशोक सुरडकर, आशा झोरे, सायली सावजी, रमेश धोत्रे, विनायक चंद, दिलीप सावजी, छोटूबापू देशमुख, रसुलभाई, दत्तू पाटील, दत्ता शिंदे, भैय्यासाहेब देशमुख, रियाज ठेकेदार, रिजवान भाई, चंद्रकांत माने, कडूबा देशमुख, शेषराव देशमुख, जगन्नाथ भांड, अबरार भाई, सुनीता भांड, लता घाईत, बबन पºहाड आदींनी उपोषण मंडपाला भेट देऊन पाठींबा जाहीर केला.
बुलडाण्यात सुबोध सावजी यांचे प्राणांतिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:36 PM
बुलडाणा : बुलडाणा जिल्हा शासकिय नळपाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ११ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण व त्यांच्या सहकाऱ्यांनी साखळी उपोषणास सुरुवात केली.
ठळक मुद्देपाणीपुरवठा योजना सुरळीत करुन नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे यासाठी समितीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.बुधवारपासून प्राणंतिक उपोषण व साखळी उपोषण सुरु करण्यात आले. राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाला भेट देऊन पाठींबा व्यक्त केला.