बुलडाणा : जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येत असलेल्या अंजनी बुद्रुक येथील पाणीपुरवठा योजनेसह १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या विनियोगामध्ये झालेल्या अनियमिततेप्रकरणी चौकशी करण्याचे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे निर्देश दिलेले असतानाही अनुषंगीक कार्यवाही झाली नाही. परिणामी चार ग्रामस्थांनी ६९ व्या प्रजासत्ताक दिनापासून थेट पाण्याच्या टाकीवर चढून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अंजनी बु. गावामध्ये नालीसफाई न करता, परस्पर देयके काढण्यात आली आहेत. गत तीन वर्षापासून नळयोजना अनियमीत असून दोन महिन्याला एकदाच पाणी पुरवठा केला जातो. चौदाव्या वित्त आयोगातून नळ योजनेवर नऊ लाख रुपये खर्च दाखवून परस्पर बिले काढण्यात आली. अंजनी बु. चे ग्रामसविच १० ते १५ दिवसात एखाद्यावेळेस गावात हजेरी लावतात. महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गतच्या कामात प्रत्यक्ष मजुर न लावता त्यावर परस्पर पैसे काढण्यात आले, यासह ग्रामपंचायतमध्ये विविध कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अंजनी बु. येथील युवकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकार यांच्याकडे केला. तसेच यासदंर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचे २ सप्टेंबर २०१७ रोजीचे पत्र प्राप्त होऊन अद्याप सदर भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे अंजनी बु. येथील गजानन नारायण नागोलकर, राम नामदेव राऊत, विष्णू शेषराव ढोले व अशोक दत्ता नागोलकर यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून गावातील पाण्याच्या टाकीवर बसून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला गावातील अनेक युवकांनी आपला पाठींबा दर्शवला आहे. दरम्यान, २७ जानेवारीला दुसºयादिवशी उपोषण सुरू आहे.
पाणीपुरवठा योजनेतील गैरकारभाराविरोधात अंजनी बुद्रुक येथील चौघांचे पाण्याच्या टाकीवर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 2:06 PM
बुलडाणा : जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येत असलेल्या अंजनी बुद्रुक येथील पाणीपुरवठा योजनेसह १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या विनियोगामध्ये झालेल्या अनियमिततेप्रकरणी चौकशी करण्याचे करण्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे निर्देश दिलेले असतानाही अनुषंगीक कार्यवाही झाली नाही.
ठळक मुद्देअंजनी बु. गावामध्ये नालीसफाई न करता, परस्पर देयके काढण्यात आली आहेत. गत तीन वर्षापासून नळयोजना अनियमीत असून दोन महिन्याला एकदाच पाणी पुरवठा केला जातो.गजानन नारायण नागोलकर, राम नामदेव राऊत, विष्णू शेषराव ढोले व अशोक दत्ता नागोलकर यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून गावातील पाण्याच्या टाकीवर बसून उपोषण सुरू केले आहे.