बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींच्या ९ हजार २२९ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला १८ जानवेारी राेजी हाेणार आहे. १६ जानेवारी राेजी जिल्ह्यातील १८०२ केंद्रांवर मतदान झाले. साेमवारी १३ तहसील मुख्यालयी सकाळी नऊ वाजता मतमाेजणीस प्रारंभ हाेणार आहे. १५६ टेबलवर ही माेजणी हाेणार असून, १८९ फेरी हाेणार आहेत. जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २८ ग्रामपंचायती अविराेध झाल्याने, तसेच एका ग्रामपंचायतीसाठी नामांकन अर्जच न आल्याने प्रत्यक्षात १६ जानेवारी राेजी ४९८ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केल्याने टक्केवारी ७७.३६ टक्क्यांवर केली. ४९८ ग्रामपंचायत क्षेत्रात ९ लाख ७० हजार ६६७ एकूण मतदार आहेत. त्यापैकी ७ लाख ५० हजार ९२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ३ लाख ५६ हजार ३५ स्त्रिया आणि ३ लाख ९४ हजार पुरुष मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान मलकापूर तालुक्यात ८२.४८ टक्के झाले, तर दुसऱ्या क्रमांकावर शेगाव तालुका ८१.९२ टक्के, तिसऱ्या क्रमांकावर ८०.९५ टक्के, तर नांदुरा ८०.५८ टक्के मतदान झाले आहे.
मतदान झाल्यानंतर उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी विजयाची समीकरणे लावणे सुरू केली आहे. तसेच काेण बाजी मारणार यावर गावागावांत चर्चा सुरू आहे. या चर्चांना साेमवारी पूर्णविराम मिळणार आहे.
पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त
जिल्ह्यातील १३ ही तालुकास्तरावर चाेख बंदाेबस्त राहणार आहे. तसेच मतमाेजणीसाठी ७७७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इतर ४४९ कर्मचारीही तैनात राहणार आहे. १८९ फेऱ्यानंतर हा निकाल पूर्ण हाेणार आहे. तसेच १५६ टेबलवर मतमाेजणी हाेणार आहे.