शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

शेतरस्त्यांचे भाग्य उजाळणार : 'पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते' योजनेतून होणार मजबुतीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 12:35 AM

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी, शेतमाल  बाजारात पोहोचविणे सुलभ व्हावे, यासाठी बारमाही शेतरस्ते (पाणंद रस् ते) बांधण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या अभिसरणामधून निधी  उपलब्ध करून देत ‘पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा  निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आला आहे. या निर्णयाने चिखली  तालुक्याला मोठा लाभ होणार ...

ठळक मुद्दे‘पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा  निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आला आहेचिखली तालुक्यातील शेतरस्त्यांचेही उजाळणार भाग्य!

सुधीर चेके पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी, शेतमाल  बाजारात पोहोचविणे सुलभ व्हावे, यासाठी बारमाही शेतरस्ते (पाणंद रस् ते) बांधण्यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या अभिसरणामधून निधी  उपलब्ध करून देत ‘पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा  निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आला आहे. या निर्णयाने चिखली  तालुक्याला मोठा लाभ होणार असून, गेल्या चार वर्षांपासून  लोकसहभागातून मोकळा श्‍वास घेणार्‍या तालुक्यातील सुमारे २५७ शे तरस्त्यांच्या मजबुतीकरणाचा प्रश्न या माध्यमातून सुटणार असल्याने त त्कालीन तहसीलदार सुरेश बगळे यांच्या पुढाकाराने तालुक्यात  लोकसहभागाने राबविल्या गेलेल्या या शेतरस्ते खुले करण्याच्या  चळवळीचे चिज झाले आहे.चिखली तालुक्यात सन २0१३-१४ मध्ये शेती आणि शेतकरी हि तासाठी महत्त्वाचे असलेले; परंतु अडचणीचे ठरणारे शेतरस्ते व पाणंद  रस्ते मोकळे करून शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाची वाहतूक करणे  सोयीचे व्हावे, यासाठी चिखली तत्कालीन तहसीलदार सुरेश बगळे  यांच्या नेतृत्वात तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी व शेतकरी  यांच्या सहभागातून शेतरस्ते खुलीकरणाची मोहीम राबविण्यात आल्याने  २५0 शेतरस्त्यांनी लोकसहभागातून मोकळा श्‍वास घेतला आहे. त्यावेळी  शेतकर्‍यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभागामुळे ती केवळ  मोहीम न राहता एक चळवळ ठरली आणि राज्यात एक उच्चांकही या  मोहिमेने प्रस्थापित केला आहे. दरम्यान, मोकळा श्‍वास घेणारे हे शेतरस्ते  अधिक सुलभ व्हावेत, यासाठी या रस्त्यांचे मजबुतीकरण आवश्यक  होते. त्यानुसार खडीकरणाच्या कामासाठी मनरेगा अंतर्गत कुशल- अकुशल कामाचा ताळमेळ बसवून खडीकरण करण्यास तत्कालीन  राज्य शासनाने मंजुरात दिली होती; मात्र पुढे ती योजना गुंडाळल्या  गेल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मजबुतीकरणाचा प्रश्न गेल्या चार  वर्षांपासून प्रलंबित होता. दरम्यान, राज्य शासनाच्या नियोजन विभाग व  रोहयो प्रभागाने २७ फेब्रुवारी २0१८ रोजी जारी केलेल्या शासन  निर्णयानुसार शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता लक्षात घेता,  शेतरस्ते हे रस्ते योजनामध्ये येत नसल्याने विविध स्त्रोतांमधून निधीच्या  उपलब्धतेबाबत येणार्‍या अडचणी लक्षात घेत शेत/पाणंद रस्त्यांची कामे  करण्यासाठी एकत्रित सूचना निर्गमित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने  दिलेल्या मान्यतेवरून ‘पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचे  निर्देश जारी केले आहेत.या योजनेंतर्गत माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते किंवा पाणंद  रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून कच्चा  व पक्का रस्ता एकत्रितपणे बांधणे या तीन बाबींचा प्रामुख्याने समावेश  असून, यासाठी चौदावा वित्त आयोग, मनरेगा, खासदार-आमदार  विकास निधी, वैधानिक विकास महामंडळांतर्गतचा निधी, गौण खनीज  विकास निधी याबरोबरच ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी मिळणारे  अनुदान, महसुली अनुदान अंतर्गत निधी व स्व-निधी, जिल्हा परिषद व  पंचायत समिती सेस आणि इतर जिल्हा योजनांमधून मिळणारा निधी  खर्च करण्यास मान्यता दिल्या गेली  असून, योजनेच्या प्रभावी  अंमलबजावणीस राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय समित्यांची स्था पना केली जाणार आहे, तसेच शेतरस्त्यांशेजारील शेतकर्‍यांचा समावेश  असलेली शेतरस्ते समितीदेखील स्थापन केली जाणार असल्याने तालु क्यात तत्कालीन तहसीलदार सुरेश बगळे यांच्या पुढाकाराने व  लोकसहभागाने खुले झालेल्या २५0 शेतरस्त्यांचे भाग्य उजळणार  असून, या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होऊन तालुक्यातील शे तरस्त्यांचे मजबुतीकरण झाल्यास हे शेतरस्ते बारमाही उपयोगात येणार  आहेत.

तीन भागात सूचना निर्गमित पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना’ राबविण्याबाबत तीन भागात सूचना  निर्गमित करण्यात आल्या आहेत. यातील भाग-अ नुसार ज्या ठिकाणी  कच्चा शेतरस्ता यापूर्वीच अस्तित्वात आहे, तो पक्का केला जाणार आहे.  अर्थात त्या रस्त्याचे मजबुतीकरण केले जाणार आहे. तर ज्या ठिकाणी  पूलवजा सीडीवर्क कामाची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी सिमेंट  पाइपचा वापर केल्या जाणार आहे. तर भाग-ब नुसार संबंधित शे तकर्‍यांच्या सहमतीने शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून कच्चा रस्ता तयार  करणे आणि भाग-क नुसार शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून कच्चा व  पक्का रस्ता एकत्रितपणे केला जाणार आहे.

तहसीलदार सुरेश बगळेंच्या पुढाकाराने २५७ शेतरस्ते खुलेशेतरस्त्यांच्या उपयोगीता आणि त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये होणारे आपसी  वाद यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सन २0१३-१४ या कालावधीत  चिखलीचे तत्कालीन तहसीलदार सुरेश बगळे यांनी परिo्रमपूर्वक तालु क्यातील तब्बल २५७ शेतरस्ते लोकसहभागातून खुले करून राज्यात  नवा उच्चांक गाठला आहे. या अंतर्गत सुमारे ३८0 किमीचे शेतरस्ते  तयार झाले असून, तालुक्यातील खंडाळा मकरध्वज, कोलारी,  गांगलगाव, हातणी, शेलूद, मालगणी, सावरगाव डुकरे, सवणा येथील  शेतरस्ते १00 टक्के अतिक्रमणमुक्त झाले आहेत. तालुक्यात ही मोहीम  राबविण्यासाठी त्यावेळी लोकसहभागातून तब्बल २ कोटी ६७ लाख रू पये खर्च झाले, हे विशेष. 

बुलडाणा, अमरावती तालुक्यातही विशेष योगदानतहसीलदार बगळे यांनी बुलडाणा येथे कार्यरत असताना या तालुक्यात  सन २0१२-१३ मध्ये ५५ कि.मी.चे ४२ शेतरस्ते ४0 हजार रूपये प्रती  कि.मी. नुसार खर्च करून खुले केले होते. यामध्ये माळवंडी या गावचे  शेतरस्ते १00 टक्के अतिक्रमणमुक्त झाले होते तर सद्यस्थितीत बुलडाणा  येथे पुन्हा तहसीलदार म्हणून रूजू झाल्यापासून सन २0१८ मध्ये आता पर्यंत ५५ कि.मी.चे ३९ शेतरस्ते खुले केले असून, यासाठी ३८ लक्ष रू पये लोकसहभागातून खर्च झाले आहेत. यामध्ये दहीद व अंभोडा ही  दोन्ही गावांतील पाणंद रस्ते हे अतिक्रमणमुक्त झाले आहेत. तर सन  २0१५-१६ मध्ये अमरावती तहसीलदार म्हणून कार्यरत असताना १४५  कि.मी.चे ७२ शेतरस्ते लोकसहभागातून खुले केले आहेत. यासाठी प्रती  कि.मी.५0 हजार रूपये खर्च झाला आहे. याठिकाणी त्यांना तत्कालीन  पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे विशेष सहकार्य लाभल्याने मनरेगा योजनेतून  या रस्त्यांचे अस्तरीकरणदेखील केले आहे. तर शिराळा व पुसदा या  गावांची पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त केले होते. दरम्यान, हे रस्ते  पावसाळय़ातदेखील उपयोगी पडावेत, यासाठी त्यांनी चालविलेल्या पाठ पुराव्याला ‘पालकमंत्री पाणंद/शेतरस्ते योजना’च्या रूपाने आता यश  आले असून, यामध्ये बुलडाणा जिल्हय़ाचे भूमिपुत्र असलेले शासनाच्या  जलसंधारण व मृदा विभागाचे सचिव एकनाथ डवले यांचा सिंहाचा वाटा  आहे. तर या योजनेसाठी तहसीलदार सुरेश बगळे यांनी केलेल्या शेतरस् त्यांची व मुरूमाचे अस्तरीकरणाची कामे मार्गदर्शक ठरली आहेत.