शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

बापाची आजारी पोराच्या जीवनासाठी धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:56 AM

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलाच्या दोन्ही किडण्या निकामी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दोन्ही किडण्या निकामी झालेल्या मुलाच्या उपचाराकरिता वृद्ध शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. घर, शेत विकूनही उपचारासाठी अधिक पैशांची गरज असल्यामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी भीमराव अंभोरे हतबल झाले आहेत. मेहकर तालुक्यात शेती करणारे भीमराव अंभोरे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मुलगी गतिमंद आहे. त्यांनी चांगले शिक्षण देत मोठा मुलगा सुदर्शन याला सॉफ्टवेअर इंजिनियर केले. सुदर्शनने शिकवणी घेण्याला सुरुवात केली. सुमारे शंभर विद्यार्थी सुदर्शनकडून संगणकाचे ज्ञान घेत होते. आई -वडिलांनी आपल्यासाठी अपार कष्ट घेतले आहे. आता त्यांच्या हितासाठी झटण्याचा त्याने निश्चय केला. हे सुखी कुटुंब आनंदाने जीवन जगत होते; मात्र काळाला हे मान्य नव्हते. एक दिवस अचानक सुदर्शन रस्त्यावर कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखविले असता, त्याच्या दोन्ही किडणी निकामी झाल्याची माहिती सुदर्शनच्या आई - वडिलांना कळली. सुदर्शनच्या वडिलांनी त्यांचे अर्धे घर विकले. आपल्या चार एकर शेतीतून पावणेदोन एकर शेतीही विकली; पण दिवसेंदिवस त्याची प्रकृती बिघडत चालली होती. आई, वडील, भाऊ, बहीण प्रत्येकांना आपली तरी किडणी सुदर्शनला वाचवू शकेल, या उद्देशाने सर्व चाचण्या केल्या; मात्र सर्वांच्याच किडणी जुळत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेवटी ते हतबल झाले होते. तेव्हा माध्यमांच्याद्वारे अनेक दानशुरांनी पुढे येऊन आपला मदतीचा हात त्यांच्या पुढे केला. पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात २०१५ मध्ये एक ब्रेन डेड व्यक्तीच्या किडनीचे प्रत्यारोपण सुदर्शनवर करण्यात आले. सुदर्शनवर शस्त्रक्रिया झाली; मात्र काही महिन्यातच त्याच्या नाकातून आणि लघवीतून रक्त वाहू लागले. डॉक्टरांनी त्याला मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार परळच्या केईएम रुग्णालयात त्याचा दीर्घकाळ उपचार सुरू होता. जीवनदायी योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत संपल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर आसपासच्या काही संस्थांनी भीमराव यांना काही मदत केली. आपल्या मुलाला होत असलेल्या यातना बघून भीमराव यांचे मन खचून गेले आहे. आता पुन्हा शस्त्रक्रिया होणार एवढी ऐपत नसल्याने सुदर्शन आहे तोपर्यंत डायलेसीसवर त्याला जगण्यासाठी दररोज नव्या उमेदिने मजुरी करणारे भीमराव आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी झटत आहेत. आठवड्यातून एक दिवस सुटी घेऊन कोणीतरी आपल्या मुलाला थोड्या दिवसांसाठी का होईना जीवनदान मिळवून देईल, या आशेने ते दात्यांचे दार ठोठावत आहेत.