लसीकरणाचे शेड्यूल देण्याची गरज
सध्या १०२ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मात्र, या लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाच सकाळी ८ वाजता लसीकरणाचे शेड्यूल मिळते. लस कोविशिल्ड आहे की, कोव्हॅक्सिन याचा अंदाजही केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाच तोपर्यंत नसतो, असे एका वरिष्ठ डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यातच वाढलेल्या गर्दीमुळे समस्येत भर पडते. त्यामुळे एक दिवस अगोदरच कोणत्या केंद्रावर कोणत्या लसीचे शेड्यूल राहणार आहे, याचे प्रशासकीय यंत्रणेने नियोजन करण्याची अवश्यकता आहे; अन्यथा या लसीकरण केंद्रांवरील गर्दीतूनच कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती आहे.
आतापर्यंत मिळाले ३ लाख डोस
जिल्ह्याला गेल्या साडेतीन महिन्यांत ३ लाख ९ हजार ६७० व्हॅक्सिनचे डोस मिळालेले आहेत. यामध्ये कोविशिल्डचे आतापर्यंत २ लाख ३७ हजार १० आणि कोव्हॅक्सिनचे ७२ हजार ६६० डोस मिळालेले आहेत. या लसी टप्प्याटप्प्याने मिळत आहेत. बुलडाणाच्या लस भांडाराची एकूण साठवण क्षमता ही पाच लाख वायलची आहे. त्यामुळे साठवणुकीची जिल्ह्यात अडचण नाही.
असे आहे लसीकरणाचे उद्दिष्ट
लोकसंख्या : २९,६४,२२०
४५ वर्षांवरील : ८,८९,२६६
फ्रंटलाइन वर्कर्स : २०,८६४
आरोग्य कर्मचारी : १६,७९८
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींची संख्याही मोठी आहे.