बुलडाणा : स्वस्त धान्य प्रणालींतर्गत होणारा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने ई-पॉसच्या माध्यमातून धान्य वितरण सुरू केले आहे. सध्या कोरोनाच्या काळात अनेक जण ई-पॉसवर बोटांचे ठसे ठेवत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे, ई-पॉसची सक्ती रद्द करण्याची मागणी स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे. राज्यभरात स्वस्त धान्य वाटपात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत होता. त्यामुळे, शासननाने ई-पॉसच्या माध्यमातून धान्य वाटप सुरू केले आहे. सध्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रामस्थांच्या बोटाच्या ठशांशिवाय धान्य वितरीत करण्यात येत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. एखादा ग्राहक कोरोना पॉझिटीव्ह असल्यास त्याच्या माध्यमातून इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, स्वस्त धान्य दुकान संघटनांनी ई-पॉसची सक्ती न करण्याची मागणी केली आहे. तसेच स्वस्त धान्य दुकान संघटना ई-पास सक्ती रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात गेली होती. त्यावर न्यायालयाने स्वस्त धान्य दुकान संघटनांच्या वतीने निकाल दिल्याची माहिती मेहकर तालुका स्वस्त धान्य संघटनेचे अध्यक्ष विनोद देशमुख यांनी दिली.जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे, गावागावात स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण आहे. एका स्वस्त धान्य दुकानदाराकडे जवळपास ६०० कार्डधारकांना जोडण्यात आलेले आहे. महिन्यातून दोन वेळा स्वस्त धान्याचे वितरण होते.त्यामुळे एकाच महिन्यात स्वस्त धान्य दुकानदारांचा १२०० ग्रामस्थांशी संपर्क येतो. त्यामुळे, स्वस्त धान्य दुकारांनामध्ये भितीचे वातावरण आहे. कोरोना संक्रमण संपेपर्यंत ई-पॉस बंद करण्याची मागणी स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच ई-पॉसवर ग्राहकांचे ठसे घेतल्याशिवाय धान्य वितरण करता येत नाही. ग्राहकांचे बोटाचे ठसे सॅनिटाईज करून ई-पॉसवर घेतल्या जातात. मात्र,कोरोना संक्रमणाची भिती आहे. न्यायलयानेही आमच्या बाजुने निकाल दिल्याने शासनाने ई पॉसची सक्ती शिथील करण्याची गरज आहे. विनोद देशमुख, मेहकर तालुका अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार संघटना
इ-पॉसमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 6:35 PM