शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

अनुदान देण्यास टाळाटाळ केल्याने फेडरेशनच्या कार्यालयाची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 8:13 PM

तूर व हरभऱ्याचे धनादेश देण्यास टाळाटाळ केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केट फेडरेशनच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटन १ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता घडली.

मलकापूर: तूर व हरभऱ्याचे धनादेश देण्यास टाळाटाळ केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केट फेडरेशनच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना १ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता घडली. सिंदखेड राजा व चिखली परिसरातील शेतकऱ्यांनी गत वर्षभरा पूर्वी नाफेडला स्थानिक ठिकाणी आपली तूर व हरभरा हा माल विक्री केला. माल विक्री करूनही फेडरेशनने चुकारे देण्यास टाळाटाळ करीत विलंब लावला. परिणामत: शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेस सामोरे जावे लागले.तर २८ फेब्रुवारी रोजी या उर्वरित २५ शेतक-यांना धनादेश घेण्याकरिता शहरातील बुलढाणा रोड स्थित विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केट फेडरेशनच्या कार्यालयात बोलविण्यात आले. मात्र अधिका-यांनी पळ काढण्यात व वेळ मारून नेण्यातच धन्यता मानल्याने शेतक-यांनी धनादेश मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला व रात्रीचे १ वाजेपर्यंत या कार्यालयातच तळ ठोकून ठीया दिला. दिवसभर उपाशी राहूनही प्रशासनाला या शेतक-यांची कसलीच कीव आली नाही. उलट कार्यालयीन कर्मचा-यांनी या शेतक-यांना मध्यरात्री बाहेर काढीत कार्यालयाला कुलूप लावले. त्यामुळे शेतक-यांनी संपूर्ण रात्र कार्यालयाबाहेर जागूनच काढली. दिवसभर उपाशी असलेला शेतकरी सकाळी कार्यालयाचे शटर उघडताच कार्यालयात शिरला व धनादेशाची मागणी करू लागला तरीही धनादेश मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने या शेतक-यांनी थेट काँग्रेस नेते तथा नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ व शहर अध्यक्ष राजू पाटील यांच्याशी संपर्क साधित त्यांना आपली व्यथा कथन केली.शेतक-यांची अडचण लक्षात घेता या दोन्ही पुढा-यांनी तात्काळ विदर्भ कॉपरेटिव्ह फेडरेशनचे कार्यालय गाठले व येथील मॅनेजर संदीप पेठकर यांच्याशी चर्चा करीत तात्काळ चेक वितरित करा अन्यथा आम्हाला तोडफोड करावी लागेल असा धमकी वजा इशारा देत दिला. परिणामत: मॅनेजर पेठकर यांनी नगराध्यक्ष अ‍ॅड हरीश रावळ व राजू पाटील यांच्या हस्ते त्या शेतक-यांना धनादेश वितरित करण्यात आले. मात्र पुढारी निघून गेल्यावर काही वेळातच सदर धनादेशवर नंबर टाकायचे आहेत व तांत्रिक अडचणी दूर करावयाच्या आहेत, असे कारण सांगत सदर धनादेश फेडरेशन विदर्भ को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या कर्मचा-यांनी परत घेतले. दुपारची सायंकाळ होत असतानाही आज आम्हाला चेक मिळणार की नाहीत असा सवाल शेतक-यांनी उपस्थित करीत पुन:श्च अ‍ॅड. हरीश रावळ राजू पाटील यांना बोलावून घेतले. परिस्थिती पाहता पाच तारखेच्या पुढे धनादेश देऊ असे संबंधित अधिका-यांकडून सांगण्यात आल्याने संतप्त पुढा-यांनी शेतकरी हितास्तव या कार्यालयाची तोडफोड केली. या तोडफोडीत कार्यालयातील संगणक, टेबल, काचा, कुलर, पंखे व खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाला शांत केले.परंतु जोपर्यंत या शेतक-यांना धनादेश मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका या पुढा-यांनी घेतली असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. यानंतर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास विदर्भ को ऑपरेटिव्हच्या नागपूर स्थित वरिष्ठ अधिकारी निचड यांनी भ्रमणध्वनीद्वारे आंदोलनकर्त्यांनी संवाद साधीत 6 मार्च रोजी सर्व शेतकरी बांधवांना त्यांचे धनादेश देऊ, असे आश्वासन दिल्याने पुढारी व शेतकरी बांधवांनी आंदोलन स्थगित केले.