शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

 बुलडाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी; सुमन चंद्रा यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 6:24 PM

श्रीमती सुमन चंद्रा यांनी आज 11 डिसेंबर 2019 रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.

 बुलडाणा  : जिल्ह्यात सर्वप्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणून येण्याचा मान डॉ. निरूपमा डांगे यांनी मिळविला होता. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी जिल्ह्याला मिळाल्या आहेत.  श्रीमती सुमन चंद्रा यांनी आज 11 डिसेंबर 2019 रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.   श्रीमती सुमन चंद्रा 2010 च्या महाराष्ट्र कॅडेर मधील आयएएस अधिकारी आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर नंदुरबार येथे परिविक्षाधीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी 2010 मध्ये कार्यभार सांभाळला. त्यानंतर 2012 मध्ये उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचे कामकाज त्यांनी सांभाळले. सन 2014 मध्ये नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्रे त्यांनी स्वीकारली. त्यानंतर 2017 मध्ये नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनच्या सह निवासी आयुक्त पदाचे त्यांनी कामकाज सांभाळले. त्यानंतर त्यांनी आज 11 डिसेंबर 2019 रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी पदाची सूत्रे प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्याकडून  स्वीकारली.   जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांचा जन्म 10 मे 1984 रोजी उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठामधून मास्टर इन फिलॉसॉफी पदवी प्राप्त केली आहे. तसेच अमेरिकेतील युनीर्व्हसिटी ऑफ कॅलीफोर्निया येथून पीएचडी पूर्वीची ‘प्री डॉक्टरेट’ पर्यावरणीय अभ्यासक्रमात मिळविली आहे.     जिल्ह्यामध्ये केंद्र व राज्य शासनाचे महत्वाकांक्षी योजना, उपक्रम, अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे. शासनाच्या योजनांचा लाभ सामान्य नागरिकाला अत्यंत सहजतेने उपलब्ध करून देणे, नागरिकांना प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध येाजनांचा जास्तीत जास्त लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्प असलेल्या जिगांवच्या निर्मितीवर विशेष लक्ष देवून हा प्रकल्प विनाअडथळा पुर्ण करण्याचा निश्चयही त्यांनी व्यक्त केला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उप जिल्हाधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय