शिंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण देखभाल गीता बुरकुल करत होत्या. आराेग्य उपकेंद्राच्या परिसरात गीताबाई बुरकुल यांनी विविध प्रकारचे फुलझाडे लावली हाेती. ८ जून राेजी सकाळी ८ वाजता त्या शिंदी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राबाहेरील भिंतीशेजारील साफसफाई करत होत्या .
बाजूला काही विटांचे तुकडे पडलेले होते. ते तुकडे बाजूला करत असताना सापाने त्यांच्या हाताला दंश केले. साप पाहिल्यानंतर सर्पदंश झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना तातडीने साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. तेथे प्रथमाेपचार केल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे नेण्यात आले. त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना बुलडाण्यातील खासगी रुग्णालयात दखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.