सिंदखेडराजा, दि. १२-दुर्गा देवीच्या उत्सवाची सांगता १२ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्यावेळी मात्र सार्वजनिक दुर्गा मंडळाच्यावतीने विसर्जन मिरवणुकीत लेजीम, टिपर्यांच्या तालावर व गाण्यात निनादामध्ये नारी शक्तीचा जल्लोष उल्लेखनीय होता.दुर्गा देवीची घटस्थापना १ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. घटस्थापनेपासून अकरा दिवस दुर्गा देवीची पूजा, अर्चना करून नारी शक्तीने नऊ दिवस मनोभावे उपवास केले. सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने अकरा दिवस समाज प्रबोधनाच्या माध्यमातून लेक वाचवा लेक शिकवा, स्त्री भ्रूणहत्या, वृक्षारोपण जलसंवर्धन, अंधङ्म्रद्धा व्यसनमुक्ती, वृक्ष संवर्धन ग्राम स्वच्छता या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करुन शहरवासीयांचे लक्ष वेधले. साखरखेर्डा येथे दुर्गादेवी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाला. तब्बल नऊ दिवस दांडिया-गर्भा नृत्य नित्यनियमाने भाविकांनी सादर केले. १२ ऑक्टोबर रोजी प्रत्येक मंडळाने वेगवेगळी मिरवणूक काढल्याने सार्वजनिक मिरवणुकीत फक्त तीन मंडळं सहभागी झाली होती. आज सकाळी ११ वाजता माळी पुर्यातील तीन मंडळांनी दुर्गादेवीची मिरवणूक काढून दुपारी १ वाजता भोगावती नदीवर विसर्जन केले. या मंडळांना सार्वजनिक मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनने परवानगी दिली नसल्याचा आरोप सुनील जगताप यांनी केला. त्यानंतर त्यांनी केवळ माळीपुर्यातूनच मिरवणूक लढली. दुपारी २ वाजता सार्वजनिक मिरवणुकीत परदेशी नवदुर्गा मंडळ, होळकर नवदुर्गा मंडळ आणि वीर लहूजी उत्सव मंडळ सहभागी झाले होते. बाकी छोटे-मोठे १0 मंडळांनी परस्पर आपआपल्या सोयीनुसार महालक्ष्मी तलावावर दुर्गा देवीचे विसर्जन केले.
दुर्गा देवीच्या उत्सवात नारी शक्तीचा जल्लोष
By admin | Published: October 13, 2016 2:14 AM