देऊळघाट येथील पार्श्वनाथ भगवानजीने मंदिराच्या सहाशे वर्षांपूर्वीच्या जैन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरू केले आहे. या निमित्ताने हा वेदी शिलान्यास महोत्सव साजरा होणार आहे.
परमपूज्य आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या प्रेरणेने, आचार्य विद्यासागर महाराज, कल्पवृक्ष नंदीजी महाराज, अमित सागर महाराज व विशेष सागर महाराज यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विधान आचार्य म्हणून राजेश रोकडे खामगाव हे काम पाहणार आहेत. सकाळपासून मांगलिक कार्यक्रम घटयात्रा, ध्वजारोहण श्रावक अल्पोपहार, विधान प्रारंभ, वेदी शिलान्यास व महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संगीतकार रवींद्र वायकर हे काम पाहतील. सकल दिगंबर जैन समाज, देऊळघाट व भादोला यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमासाठी भिकुलाल सिंगतकर, रमाकांत जैन, सुनील आंबेकर, राजेंद्र गोदरकर, गुणवंत जैन, बाबूराव सिंगतकर व किशोर उखळकर यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.