लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील हर्राशीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याची कानकुण लागताच, मुख्याधिकाºयांनी रविवारी खामगाव येथील हर्राशीत धडक दिली. हर्राशीतील परिस्थिती पाहून अवाक झालेल्या मुख्याधिकाºयांनी अखेर हर्राशी बंद करण्याचा निर्णय घेतला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गत २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या कालावधीत कोरोना संसर्ग आटोक्यात न आल्याने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, खामगाव येथील आठवडी बाजारात भाजीपाला हर्राशी सुरू आहे. याठिकाणी गर्दी होत आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्या जात नसल्याची कुणकुण लागताच मुख्याधिकारी धनंजय बोरीकर रविवारी पहाटे ४ वाजता भाजीपाला हर्राशीत धडकले. त्यांनी येथील परिस्थिती पाहून हर्राशी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खामगावातील हर्राशी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
कारवाईचा इशारा!कोरोना संचारबंदी काळात भाजीपाला हर्राशी सुरू केल्यास, कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.