देऊळगाव राजा : ट्रॅक्टर चालू होत नसल्याच्या कारणावरून दोन सख्ख्या भावात भांडण होऊन एकाच्या नाकाचे हाड मोडल्याची घटना जवळखेड गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
देऊळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत जवळखेड गावात शालीकराम कडुबा राऊत व अनिल कडुबा राऊत या दोन भावात वाद झाला. ट्रॅक्टर चालू होत नसल्याने अनिल राऊत याने शालीकराम राऊत यास शिवीगाळ केली. तसेच नाकावर जोरात बुक्का मारला. त्यामुळे फिर्यादी हाताखाली असलेल्या दगडावर पडला. नाकाचे हाड फ्रॅक्चर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्यावरून पाेलिसांनी अनिल राऊत विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बिट जमादार विजय गीते, पोकॉ सुनील वाघ तपास करीत आहेत.