शेगाव (जि. बुलडाणा) : मुलाला विद्युत मंडळात नोकरीवर लावून देतो, असे म्हणून तीन लाखाने फसवणूक करणार्या शेगाव येथील दिवाणी न्यायालयातील एका कर्मचार्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शेगाव येथील विठ्ठल भगवान हंतोडे यांनी पोलिसात तक्रार दिली की, आपले शिवाजी चौक परिसरात सलुन असून, न्यायालयात काम करणार्या प्रवीण वसंता पल्हाडे याने तुमचा मुलगा महादेव याला नोकरीवर लावून देतो, माझी विद्युत मंडळात चांगली ओळख आहे, असे म्हणून तीन लाख रुपयांची मागणी केली; मात्र पैसे दिल्यानंतरही मुलाला नोकरी लागली नाही म्हणून पल्हाडे यांच्या मागे पैशासाठी तगादा लावला असता दोन लाख ७५ हजार रुपये दिले व उर्वरित २५ हजार देण्यास टाळाटाळ करतो. त्यामुळे आपली पल्हाडे यांनी फसवणूक केली असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी, अशी तक्रार केल्यानंतर आरोपीविरुद्ध कलम ४२0 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Published: May 15, 2015 12:59 AM