शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

मलकापूरात अंकूर सिड्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:14 PM

अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनी यांच्या मलकापूर स्थित बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रात अंकुर ३०२८-बी जी-२ या संकरित कापूस वाणाच्या नमुन्यात तणनाशक सहनशील जनुकीय अंश आढळून आल्याचे उघड झाले आहे.

मलकापूर: अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनी यांच्या मलकापूर स्थित बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रात अंकुर ३०२८-बी जी-२ या संकरित कापूस वाणाच्या नमुन्यात तणनाशक सहनशील जनुकीय अंश आढळून आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कंपनीविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा व कलम ४२० अन्वये २९ जुलैरोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.    अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनी बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातून विभागीय कृषी सह संचालक अमरावती विभागातील बियाणे निरीक्षक तथा तंत्र अधिकारी डॉ. पंकज चेडे यांनी १८ मे रोजी नमुने घेतले होते. संकरित कापूस अंकुर ३०२८-बी जी- २ (लॉट नं १५४-३७८९२, टॅग नं  १०८७५०२) या सत्यता दर्शक वाणाचा नमुना महाराष्ट्र कापूस बि-बियाणे नियम, २०९ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ मधील कलम १० व ११ अन्वये विश्लेषणाकरीता ताब्यात घेण्यात आला होता. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे २५ मे रोजी हा नमुना विश्लेषणाकरीता सादर करण्यात आला होता. त्यानंतर १९ जुलै रोजी केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या विश्लेषण अहवाला नुसार केंद्र शासनाच्या जनुकीय तंत्रज्ञान समितीने प्रतिबंध घातलेले तणनाशकास सहनशील अंश ३० % पॉजीटीव्ही आढळून आलेले आहे. अश्या बियाण्याच्या वापरामुळे कापूस उत्पादनावर परिणाम होऊन शेतीचे तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. वास्तविकत: अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनी, २७, नवीन कॉटन मार्केट नागपूर यांनी महाराष्ट्र कापूस बि-बियाणे अधिनियम २००९ नुसार कापूस बियाणे दर्शविल्याप्रमाणे वास्तविक नसणे, बनावट/प्रतिबंधित असणे, नमूद केलेल्या जणुकाशिवाय इतर परिभाषित बियाणे जणूकाचा समावेश करणे , कापूस बियाणे नोंदणी केलेल्या वैशिष्टांपैकी नसणे,पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार कथीत केल्याप्रमाणे बियाणे परिभाषित नसणे, गैरमानक बियाण्याची विक्री करणे लेबलवर खोटे दावे करणे, पाकिटावर तणनाशकास सहनशील जनुकीय अंश असणारे बियाणे नाही असे नमूद आहे. असे असतांनाही तणनाशकास सहनशील जनुकीय अंश कापूस बियाण्यांची विक्री करणे तसेच पर्यावरण दृष्ट्या प्रतिबंधात्मक पदार्थाच्या हाताळणीसाठी कार्य पद्धती व सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करणे, प्रतिबंधित बियाण्याची माहिती न देणे-लपवणे, तसेच महाराष्ट्र कापूस बि-बियाणे अधिनियम २०९ चे कलम १३ व पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ कलम १५ अन्वये शिक्षेस पात्र आहे. त्याचप्रमाणे भारतीय दंड विधान कलम ४२० नुसार कापूस बियाणे विक्री पाकिटावर केंद्र शासनाच्या जनुकीय तंत्रज्ञान समितीने प्रतिबंध घातलेले एच टी जिन या बीयाण्यांमध्ये नाही असे स्पष्ट नमूद केले आहे. असे असतांनाही तणनाशकास सहनशील जनुकीय अंश कापूस बियाण्याची विक्री केली आहे.  याप्रकरणात कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत मात्र संकरित कापूस बि जी २ कापूस बियाण्याचे उत्पादक करण्याचाच परवाना असतांना सुद्धा पर्यावरणास हानिकारक तणनाशकास सहनशील जनुकीय अंश असणा-या अनधिकृत कापूस बियाण्याचे उत्पादन व विक्री करून शेतकरी व शासनाची फसवणूक केलेली आहे. या प्रकरणी कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केलेले असल्याने अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनीचे नागपूर स्थित व्यवस्थापकीय संचालक तसेच जबाबदार अधिकारी बी चिरंजीवी रेड्डी, उपप्रादेशिक व्यवस्थापक मलकापूर यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार विभागीय कृषी सह संचालक अमरावती विभागाचे बियाणे निरीक्षक तथा तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) डॉ.पंकज चेडे यांनी २८ जुलै रोजी रात्री मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिली. यावेळी अमरावतीचे विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत म्हस्करे व बुलढाण्याचे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक प्रवीण खर्चे उपस्थित होते.  शहर पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ४२०, महाराष्ट्र कापूस बि-बियाणे अधिनियम २००९ नुसार  कलम 13, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार १५ अश्या प्रकारे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पो.नि.रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली पो.उ.नि.अमोल बच्छाव करीत आहे. (प्रतिनिधी)

- मान्यता नसलेला जिन तपासणीत आढळल्याने प्राप्त झालेल्या अहवालावरूनच अंकुर सिड्स प्रा.ली.विरुद्ध कार्यवाहीचे पाऊल उचलण्यात आले. -प्रवीण खर्चेजिल्हा गुण नियंत्रक निरीक्षक,बुलढाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा