लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम विश्वी येथील युवतीशी साखरपुडा करून लग्नखर्चासाठी ५ लाख रुपये घेऊनही लग्नास नकार देणार्या युवकाविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची घटना घडली. मेहकर तालुक्यातील विश्वी येथील युवतीचा साखरपुडा १४ जून २0१७ ला राजुरा अढाव जिल्हा वाशिम येथील जगदीश प्रकाश अढाव याच्याशी ग्राम विश्वी येथे झाला होता. त्यावेळी लग्नखर्चाकरिता युवतीच्या वडिलांनी ५ लाख रुपये दिले होते व त्यानंतर युवतीचे वडील व इतर नातेवाईक लग्नाची तारीख निश्चित करण्याकरिता गेले असता आरोपीतांनी वेगवेगळी कारणे सांगून युवतीशी लग्न करण्यास नकार दिला व शिवीगाळ करून धमकी दिली व आता आम्ही लग्न करू शकत नाही, असे सांगून युवतीची फसवणूक केली. युवतीच्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस स्टेशनला जगदीश प्रकाश अढाव, प्रकाश दिगंबर अढाव, वनिता प्रकाश अढाव व इतर सहा जणांविरुद्ध डोणगाव पोस्टेला कलम ४२0, ४0६, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खर्च घेऊन लग्नास नकार देणार्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 1:34 AM
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम विश्वी येथील युवतीशी साखरपुडा करून लग्नखर्चासाठी ५ लाख रुपये घेऊनही लग्नास नकार देणार्या युवकाविरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची घटना घडली.
ठळक मुद्देलग्नखर्चाकरिता युवतीच्या वडिलांनी दिले होते ५ लाख रुपये लग्नाची तारीख निश्चित करण्याकरिता गेले असता वेगवेगळी कारणे सांगून युवतीशी लग्न करण्यास दिला नकार