शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

नोकरभरतीमध्ये ओबीसींचा अनुशेष भरून काढणार -विजय वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 12:06 PM

Vijay Vadettiwar महत्त्वपूर्ण घोषणा मदत व पुनर्वसन तथा ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केली.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : ओबीसींचे आरक्षण व पदोन्नतीचा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल. नोकरभरतीमध्ये ओबीसींचा अनुशेष भरून काढण्याला प्राधान्य राहील, ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्यासह मूलभूत समस्या सोडविण्यात येतील. एवढेच नव्हे, तर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृहे उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मदत व पुनर्वसन तथा ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केली.कोल्हटकर मंगल कार्यालयात रविवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव महाअधिवेशन पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष बबनराव तायवाडे, तर माजी कामगार कल्याणमंत्री, आमदार डॉ. संजय कुटे, आ. अ‍ॅड. आकाश फुंडकर, आ. राजेश एकडे, माजी आमदार नारायण मुंडे, दिलीपकुमार सानंदा, राहुल बोंद्रे, काँग्रेस नेते श्याम उमाळकर, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल अमलकार, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी राणे, विठ्ठल लोखंडकार, दत्ता खरात उपस्थित होते.  ओबीसी समाजबांधवांनी आपसातील वाद सोडून न्याय मिळविण्यासाठी एकजुटीने काम करावे, असा सल्ला यावेळी वडेट्टीवार यांनी दिला. बहुजनांवरील अन्याय सहन करणार नाही. ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, यासाठी आपण स्वत:हून आग्रही भूमिका घेतली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला थोडाही धक्का लागू देणार नाही. येणाऱ्या काळात ३० हजार ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती योजनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ. माणूस, राजकीय नेता आणि मंत्री नव्हे, तर ओबीसींचा एक घटक म्हणून समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी लढणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष रमेश घोलप यांनी समाजाच्या समस्यांचे विस्तृत विवेचन केले. अध्यक्षीय भाषणातून तायवाडे यांनी संघटनेची भूमिका विशद केली. सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा. महाभरती करून १ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींकडे केली.  प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अनिल अमलकार, तर संचालन अरविंद शिंगाडे यांनी केले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारkhamgaonखामगाव