बुलडाणा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक निर्बंध लादले आहेत. तसेच आठवडी बाजार भरण्यास बंदी घातली आहे. असे असले तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे दुसरबीड येथे उलंघन झाले. ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि सचिव त्यांनी या लोकांना दुकाने मांडण्याकरिता प्रतिबंध केला त्याचप्रमाणे काही लोकांना दंडसुद्धा केला. परंतु काहीएक न जुमानता या लोकांनी आपली दुकाने सुरू केली. याबाबत ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत सचिव चौधरी यांना विचारणा केली असता बाजार भरवण्यास आम्ही विराेध केला. तसेच काही व्यापाऱ्यांना दंडही केला. मात्र, जबरदस्तीने व्यापाऱ्यांनी दुकाने लावली. याबाबतची माहिती तहसीलदार सिंदखेडराजा, बीडीओओ पंचायत समिती त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन किनगाव राजा यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी नऊ ते पाचपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश करू नये अनेक लोकांनी आपली दुकाने संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवली जात असल्याचे दिसून येते. काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
दुसरबीड येथे भरला आठवडी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:32 AM