डोणगाव : ग्रामपंचायतच्या कारभाराची चाैकशी करून दाेषींवर निलंबन करण्यासाठी निवेदन दिल्याने डाेणगावातील घंटा गाड्या बंद करण्यात आल्या हाेत्या़ याविषयी लाेकमतने वृत्त प्रकाशित केले हाेते़ तसेच स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने २६ जून राेजी आंदाेलन करण्यात आले़ या आंदाेलनाची ग्रामपंचायत दखल घेत घंटागाड्या सुरू केल्या आहेत़
डाेणगाव ग्रामपंचायतच्या कारभाराची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली हाेती़ त्यामुळे ग्रामपंचायतने घंटागाड्या बंद केल्या हाेत्या. त्यामुळे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले व तालुका अध्यक्ष अमोल धोटे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात केले़
तब्बल तीन तास घोषणाबाजी करत ग्रामपंचायतच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू होते़ यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी जोपर्यंत घंटागाड्या चालू होणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील अशी आक्रमक भूमिक घेतली हाेती़ त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत मात्र अखेर स्वाभिमानीच्या आंदोलनाची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने घंटागाड्या सुरू केल्या़ त्यामुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल धोटे, भागवत जाधव, विजय गोरे, निलेश सदावर्ते ,राजू पळसकर, मिनेश बाजड ,निलेश आखाडे, राम आखाडे, गणेश वैद्य,पवन वानी अवी खोडके, युनूस अली शाह, सद्दाम शाह जावेद शाह, सलीम शहा, सलीम बिबन शहा ,इक्बाल अलिषा ,परवेज अली शाह ,सोहेल शाह, अक्रम आतार ,सोफियान आतार ,जुबेर शाह जाहेद ,मौलाना युसुफ पठाण ,मोसिन शाह, संतोष खोडके, कलीम शेख,शेख कासम.नजीर भाई,सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.