बुलडाणा : अंढेरा पाेलीस स्टेशनचा वाहतूक पाेलिस कर्मचाऱ्याचा पैसे घेतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर १३ जून राेजी व्हायरल झाला आहे़. पाेलीस अधिक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सदर पाेलीस कर्मचाऱ्यास १५ जून राेजी निलंबीत केले आहे़. या कर्मचाऱ्याची बदली मुख्यालयात करण्यात आली आहे़.
चिखली देऊळगाव राजा महामार्गावरील वाकी फाट्यावर १३ जून राेजी सायंकाळी अंढेरा पोलीस स्टेशनचे पथक वाहतुकीच्या केसेस करत हाेते़ दरम्यान, एका वाहतूक पाेलिसाने काळीपिवळी चालकाकडून चक्क अडीचशे रुपयांची लाच स्वीकारली़ लाच घेतानाचा एकाने व्हिडिओ तयार करून ताे समाज माध्यमांवर व्हायरल झाला हाेता़. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पाेलीस अधीक्षकांनी संबधीत पेालीस कर्मचारी व इतरांचे जबाब नाेंदवले हाेेते़. त्यानंतर १५ जून राेजी लाच घेणाऱ्या वाहतुक पाेलीस कर्मचारी राजु चाैधरी यास निलंबीत केले आहे़. त्याची मुख्यालयी बदली करण्यात आली आहे़.
अंढेरा पाेलिस स्टेशनला लाचखाेरीचे ग्रहणअंढेरा पाेलीस स्टेशनला लाचखाेरीचे ग्रहणच लागले आहे़. या पूर्वी अंढेरा पाेलीस स्टेशन चार ठाणेदार आणि चार कर्मचारी लाच प्रकरणात निलंबीत झाले आहेत़ तरीही लाचखाेरी सुरूच असल्याचे समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून समाेर आले आहे़.
प्रकरणाची सखाेल चाैकशी करण्याची गरजअंढेरा पाेलीस स्टेशनच्या या लाचखाेरीची सखाेली चाैकशी हाेण्याची गरज आहे़. सर्रास हप्ते वसुली करण्याची हिंमत पाेलीस कर्मचाऱ्याची कशी हाेते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे़ त्यामुळे, या कर्मचाऱ्यास पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज आहे़.
समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत त्या कर्मचाऱ्यास निलंबीत करण्यात आले आहे़ तसेच या कर्मचाऱ्याची मुख्यालयी बदली करण्यात अली आहे़.- अरविंद चावरीया, पाेलीस अधीक्षक बुलडाणा