साखरखेर्डा हे गाव मेहकर, चिखली शहरापासून ३० किमी अंतरावर आहे. या गावाची लोकसंख्या १८ हजार असून संलग्न ३५ खेडी आहेत. जालना आणि औरंगाबाद ही आर्थिक आणि वैद्यकीय दृष्टीने महत्त्वाची शहरे असल्याने दररोज शेकडो प्रवाशी प्रवास करतात. साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा या तीन जिल्हा परिषद सर्कल मधून केवळ एकच बस या मार्गावर धावत होती. प्रवाशांनी आपली अडचण माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख यांना सांगितली. त्यांनी तत्काळ दखल घेऊन पालकमंत्री डॉ .राजेंद्र शिंगणे यांच्याशी संपर्क साधून मेहकर आगार प्रमुख रनधीर कोळपे यांना पत्र दिले. प्रवाशांची सततची मागणी लक्षात घेता रविवारी आज सकाळी ९ वाजता ही बस साखरखेर्डा बस स्थानकावर आली. जिल्हा परिषद सदस्य राम जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीरअप्पा बेंदाडे यांनी वाहक जी. बी. करवते आणि चालक ए. यू. मोरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी पिंपळगाव सोनारा येथील सरपंच तोताराम ठोसरे, जमना प्रसाद तिवारी, माजी उपसरपंच शेख शफी जमादार, माजी प्राचार्य डी. ए. पंचाळ अमरसिंग राजपूत उपस्थित होते.
अखेर साखरखेर्डा ते औरंगाबाद बस सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:29 AM