धामणगाव धाडः येथून जवळच असलेल्या गुम्मी येथील हातपंप गत महिनाभरापासून बंद पडले हाेते. त्यामुळे महिलांची पाण्यासाठी भटकंती हाेत असल्याचे वृत्त ‘लाेकमत’ने ८ फेब्रुवारी राेजी प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची दखल ग्रामपंचायत प्रशासनाने घेऊन हातपंपाची दुरुस्ती केली. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
धामणगाव धाड येथून जवळच असलेल्या गुम्मी येथील हातपंप गेल्या महिन्याभरापासून बंद पडले हाेते. गावात पाण्याचा दुसरा स्रोत नसल्याने, महिलांची थंडीत पाण्यासाठी भटकंती हाेत हाेती. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सचिव राजरतन जाधव व प्रशासक पुरुषोत्तम सोनुने व बीडीओ सावळे यांच्याकडे केली हाेती. मात्र, १५ दिवसांचा कालावधी लाेटूनही ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेण्यात आली नव्हती. याविषयी ‘लाेकमत’ने ८ फेब्रुवारी राेजी वृत्त प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन हातपंपाची दुरुस्ती केली आहे, त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.