डाेणगाव येथे बिएसएनएलची नेटवर्क सेवा वारंवार खंडीत हाेत असल्याने अनेकांनी बिएसएनएलचे कनेक्शन बंद केले. तसेच अनेकांनी खाजगी नेटवर्क व इतर माेबाईल कंपन्यांचे नेटवर्क घेतले. परंतु तेही धिम्या गतीने चालत असल्याने बॅंक, पाेलीस प्रशासन, व्यापारी, सेतुकेंद्र चालक व ग्रामपंचायतला उभे राहणरे इच्छुक उमेदवार त्रस्त झाले हाेते. त्यामुळे २५ डिसेंबरला लाेकमतने वृत्त प्रकाशित करताच बिएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी डाेणगांव गाठून स्थानिक बुलडाणा जिल्हा केंद्रीय बॅंकेच्या समाेरील नेटवर्कची दुरूस्ती करून डाेणगावात बिएसएनएलचे नेटवर्क सुरू केले आहे.त्यामुळे ग्राहकांसह ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. बीएसएनएलचे नेटवर्क नेहमी विस्कळीत राहत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे, बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देउन सुरळीत सेवा देण्याची मागणी हाेत आहे.
अखेर बीएसएनएलची सेवा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:27 AM