कोरोनामुळे दगावलेले प्रा. डॉ. गौतम अंभोरे व स्व. राहुल भटकर यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब कोलमडले आहे. दोघांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. कोरोनाच्या उपचारावरही प्रचंड खर्च झालेला असल्याने दोन्ही कुटुंबीय आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते. त्यात पेन्शन केस होण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेमुळे विलंब लागणार असल्याने या कठीण काळात कोरडे सांत्वन न करताना कुटुंबीयांस आर्थिक मदत पुरविण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपसात चर्चा करून कर्मचारी पतसंस्थेद्वारे आर्थिक मदतीचा निर्णय घेतला. त्यानुसार महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉ. ओमराज एस. देशमुख यांच्यासह श्री शिवाजी महाविद्यालय येथील वरिष्ठ कर्मचारी व पतसंस्था चिखलीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजू गवई तथा सचिव राजेंद्र करपे, संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कर्मचारी कल्याण निधी उभारून प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एक लाखाची आर्थिक मदत दिली आहे. मदतीचे धनादेश प्राचार्य डॉ. देशमुख व पतसंस्थाध्यक्ष प्रा. डॉ. गवई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महिला प्राध्यापकांनी साडीचोळी देऊन दोन्ही कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी माजी प्राचार्य डॉ. गारोडे, डॉ. बोबडे, डॉ. मालटे, डॉ. जाधव, डॉ. पोच्छी, प्रा. काटोले, डॉ. निकम, डॉ. जुक्कलकर, डॉ. मुळे, डॉ. कलाखे, डॉ. हेमके, डॉ. नल्ले, डॉ. कदम, प्रा. साळवे, डॉ. जाधव, डॉ. गायकवाड, खिल्लारे, चव्हाण, बाहेकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाने हिरावलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांस आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:34 AM